शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माझं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना वाचवतंय; सुब्रमण्यम स्वामींकडून घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 09:13 IST

'CBIनंतर आता EDचे अधिकारी रडारवर असतील'

नवी दिल्ली: सीबीआयमधील अंतर्गत संघर्ष टोकाला गेल्यावर मोदी सरकारनं दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पदावरुन दूर केलं. यावरुन आता भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. माझं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत आहे. सीबीआयनंतर आता पुढची कारवाई अंमलबजावणी संचलनालयातील (ईडी) अधिकाऱ्यांवर होईल, असं स्वामी यांनी म्हटलं आहे. सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर मोदी सरकारनं हस्तक्षेप केला. या दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरुन दूर करण्याची कारवाई सरकारकडून करण्यात आली. सरकारच्या या कारवाईवर सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली. सीबीआयनंतर पुढचा क्रमांक ईडीचा असेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. सीबीआयपाठोपाठ ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच संपेल, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.सीबीआय नरसंहारमध्ये सहभागी असलेल्या व्यक्ती आता अंमलबजावणी संचलनालयातील अधिकारी राजेश्वर सिंह यांना निलंबित करणार आहेत, असा खळबळजनक दावा राज्यसभेतील खासदार स्वामी यांनी केला. 'पीसीच्या विरोधात आरोपपत्र दाखल होऊ नये, यासाठी सीबीआय नरसंहार घडवणारे काहीजण ईडीच्या राजेश्वर यांचं निलंबन करतील. असं घडल्यास माझ्या भ्रष्टाचारविरोधातील लढाईला काहीच अर्थ उरणार नाही. कारण माझं सरकारच भ्रष्टाचाऱ्यांना वाचवू पाहत आहे,' असा गंभीर आरोप स्वामी यांनी म्हटलं. स्वामी बहुतेकदा पी. चिदंबरम यांचा उल्लेख पीसी असा करतात. ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह सध्या चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदी