'धोनी एक चांगला लीडर, त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी'; भाजपा नेत्याकडून ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:49 PM2020-08-16T14:49:15+5:302020-08-17T07:42:56+5:30

धोनीने अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दर्शविला नाही.

bjp mp subramaniam swamy says ms dhoni should fight 2024 lok sabha elections | 'धोनी एक चांगला लीडर, त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी'; भाजपा नेत्याकडून ट्विट

'धोनी एक चांगला लीडर, त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी'; भाजपा नेत्याकडून ट्विट

Next
ठळक मुद्देभाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर महेंद्रसिंह धोनीला सल्ला देणारे ट्विट केले.धोनीने अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दर्शविला नाही.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने ही निवृत्तीची घोषणा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून केली आहे. निवृत्तीनंतर भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, धोनीने अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दर्शविला नाही.

भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर महेंद्रसिंह धोनीला सल्ला देणारे ट्विट केले. यामध्ये "एमएस धोनी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, पण दुसर्‍या कशापासून नाही. आव्हानांसोबत लढा देण्याची त्याची प्रतिभा आणि त्याने क्रिकेटमध्ये दाखविलेल्या संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता सार्वजनिक जीवनात आवश्यक आहे. त्याने 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवावी," असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जगातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. तसेच, या व्हिडीओला 'मैं पल दो पल का शायर हूँ,' हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. "तुम्ही दिलेलं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे…1929 (म्हणजे संध्याकाळी 7.30) पासून मला निवृत्त समजावे," अशी कॅप्शन त्याने या पोस्टला दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, धोनीने 90 कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना 38.09 च्या सरासरीने 6 शतके व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. तर 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 50.57 च्या धडाकेबाज सरासरीने 10 हजार 773 धावा फटकावल्या. त्यामध्ये 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. 

याचबरोबर, ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धोनीने 98 सामन्यांत 1617 धावा केल्या. फलंदाजीसोबतच धोनीने यष्टीमागूनही त्याने भारतीय संघाला भरभरून योगदान दिले. यष्टीरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, तर वनडेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
 

Web Title: bjp mp subramaniam swamy says ms dhoni should fight 2024 lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.