शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यालयातील कार्यक्रमादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या प्रकृतीत बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 11:51 IST

भोपाळमधील कार्यक्रमादरम्यान तब्येतीत अचानक बिघाड

ठळक मुद्देभाजपा कार्यालयात कार्यक्रमासाठी गेलेल्या ठाकूर यांची प्रकृती बिघडलीसध्या ठाकूर यांची प्रकृती ठीक; वैद्यकीय पथक तपासणीसाठी घरी पोहोचलंउच्च क्षमतेच्या औषधांचा परिणाम झाल्याची शक्यता

भोपाळ: भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती बिघडली आहे. भोपाळमधील भाजपा कार्यालयात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ठाकूर उपस्थित होत्या. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना घरी नेण्यात आलं. लॉकडाऊन सुरू होण्याआधीपासून भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. अनलॉक सुरू होताच ठाकूर भोपाळमध्ये परतल्या. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या भोपाळमधल्या पक्ष कार्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली.पक्ष कार्यालायत पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना भोवळ येऊ लागली. जवळच उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांनी होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. त्यानंतर लगेचच त्यांना खुर्चीत बसवण्यात आलं. थोड्या वेळानं त्यांना घरी नेण्यात आलं. सध्या प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या घरी आहेत. एक वैद्यकीय पथक त्यांच्या तपासणीसाठी पोहोचलं आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या डोळ्यांवर उपचार सुरू आहेत. या उपचारांचा भाग म्हणून घेत असलेल्या औषधांचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असण्याची शक्यता आहे. प्रज्ञा ठाकूर यांची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. जास्त क्षमतेची औषधं घ्यावी लागत असल्यानं प्रज्ञा ठाकूर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणं टाळतात. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरBJPभाजपा