शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 09:07 IST

शिवसेनेवर सातत्यानं टीका करणाऱ्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली: शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं शरसंधान साधणाऱ्या नारायण राणेंना मोदी सरकारकडून स्पेशल गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार असलेले नारायण राणे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. राणे त्यांच्या दिल्लीवारीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. नारायण राणे सातत्यानं ठाकरे सरकारवर शाब्दिक प्रहार करत आहेत. यासोबतच पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं आतापासूनच सर्व ताकद पणाला लावली आहे. राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

अमित शहांचा दौरा फलदायी?काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात आले होते. त्यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. या भेटीत शहांनी राणेंच्या कामाचं आणि त्यांच्या कार्यशैलीचं अगदी तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपत आलेले राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सातत्यानं शाब्दिक हल्ले करतात. राणे आक्रमक नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. केंद्रात जवळपास मंत्रालयं आहेत. सध्याच्या घडीला ६० मंत्र्यांकडे त्यांची जबाबदारी आहे. अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे अतिरिक्त प्रभार आहे. त्यामुळे लवकरच नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. शिवसेना, शिरोमणी अकाली दलानं साथ सोडल्यानं त्यांच्या वाट्याची दोन मंत्रिपदंही रिक्त आहेत.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका