शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"हिंदुत्वावर व्हिडीओ बनवल्यास...", भाजप खासदाराला फोनवरून जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 00:04 IST

Mahendra Singh Solanki: देश आणि हिंदुत्वासाठी काम करणारा कोणालाच घाबरत नाही, असे खासदार महेंद्रसिंह सोलंकी  म्हणाले.

मध्य प्रदेशातील देवासमध्ये एका भाजप खासदाराला व्यक्तीने फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी भाजप खासदाराने पोलिसांकडे तक्रार केली आहे. हिंदूत्ववादी व्हिडिओ बनवल्याबद्दल संबंधीत व्यक्तीकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचे भाजप खासदाराने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा देवास एसपींनी तपास सुरू केला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, ज्या व्यक्तीने खासदाराला फोन केला, तो उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रहिवासी असल्याचे समजते. पोलिसांनी सांगितले की, देवास शाजापूरचे खासदार महेंद्रसिंह सोलंकी यांना शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीकडून फोनवर जीवे मारण्याची धमकी आली. महेंद्रसिंह सोलंकी हे राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी व्हिडिओ बनवतात, त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली. महेंद्रसिंग सोलंकी आलेला फोन हा उत्तर प्रदेशातील कानपूरमधून आल्याचे समोर आले आहे.

महेंद्रसिंह सोलंकी यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळी ११.४० च्या सुमारास ते त्यांच्या टिळक नगर येथील निवासस्थानी होते. दरम्यान त्यांच्या नंबरवर फोन आला. फोन करणाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी दिल्यानंतर त्या व्यक्तीने फोनवर शिवीगाळ सुरू केली, त्यानंतर खासदार महेंद्रसिंह सोलंकी यांनी फोन कट केला. ज्या नंबरवरून कॉल आला होता, तो आता बंद करण्यात येत असल्याचे महेंद्रसिंह सोलंकी  यांनी सांगितले. याप्रकरणी महेंद्रसिंह सोलंकी यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. 

दरम्यान, देश आणि हिंदुत्वासाठी काम करणारा कोणालाच घाबरत नाही, असे खासदार महेंद्रसिंह सोलंकी  म्हणाले. तसेच, "मी कोणालाही घाबरत नाही. जर कोणी देशासाठी काम करत असेल तर त्याला सतत धमक्या येत असतात, अशा धमक्यांची मी अजिबात पर्वा करत नाही. माझे काम आजवर जसे आहे, तसे सुरू राहणार आहे", महेंद्रसिंह सोलंकी यांनी सांगितले.

न्यायाधीश बनले खासदार! देवास शाजापूरचे खासदार महेंद्रसिंह सोलंकी यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदाच भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकली होती. यापूर्वी महेंद्रसिंह सोलंकी हे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. २०१९ मध्येच त्यांनी न्यायाधीशांची खुर्ची सोडली आणि लोकसभा निवडणूक लढवली. यानंतर पक्षाने त्यांना २०२४ मध्ये पुन्हा संधी दिली आणि ते पुन्हा विजयी झाले. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रल्हाद टिपणया यांचा पराभव केला आणि २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मालवीय यांचा पराभव केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपाMember of parliamentखासदारMadhya Pradeshमध्य प्रदेश