शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

“आता CM अरविंद केजरीवाल यांचा नंबर”; संजय सिंह यांच्या अटकेनंतर भाजप नेते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 17:12 IST

देव सगळे पाहत आहे, लवकरच अरविंद केजरीवाल यांचा नंबर येऊ शकतो, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

BJP Vs CM Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना अटक करीत आज ईडीने  सत्ताधारी आम आदमी पार्टीला आणखी एक मोठा हादरा दिला. मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ मद्य धोरण घोटाळ्यातील दुसरी सर्वात मोठी अटक ठरली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे लवकरच या घोटाळ्याचे सूत्रधार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचतील, असा दावा भाजपचे नेते करीत आहेत. यातच भाजप खासदार मनोज तिवारी यांनी आता पुढचा नंबर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा असून, लवकरच ते कारागृहात असतील, असा दावा केला आहे. 

संजय सिंह यांची अटक ही दिल्लीतील जनतेचा विजय असून, सत्येंद्र जैन यांच्यापासून सुरू झालेला भ्रष्टाचाराचा हा खेळ मनिष सिसोदिया यांच्यानंतर आता संजय सिंह यांच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक होईल. ते तुरुंगात दिसतील, अशी प्रतिक्रिया मनोज तिवारी यांनी दिली आहे. गुन्हा करताना आरोपीला असे वाटत असते की, आपण जे काही करत आहोत, ते कुणाच्या नजरेत येत नाही. मात्र, देव सर्व काही पाहत असतो, असेही मनोज तिवारी यांनी म्हटले आहे. 

भ्रष्टाचाराविरोधात लढणारे आज भ्रष्टाचारात बुडालेत

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही यावर भाष्य करताना अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. भारतातील भ्रष्टाचारविरोधात एकेकाळी लढाई सुरू केलेल्या व्यक्ती आता भ्रष्टाचारात बुडाल्याचे दिसत आहे. या प्रकरणातील मास्टरमांइड बाहेर असून, लवकरच तोही कारागृहात असल्याचे पाहायला मिळेल, असे सूतोवाच अनुराग ठाकूर यांनी केले. 

दरम्यान, आता दिल्लीतील जनतेला न्याय मिळू लागला आहे. असा भ्रष्टाचार करणारे आणि ते कुणाला कळणार नाही असा विचार करणारे अरविंद केजरीवालच असू शकतात. कमिशन २ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत नेले, हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. आप खासदार संजय सिंह सातत्याने सांगत आहेत की, त्यांच्या घरात काहीही सापडले नाही, परंतु त्यांनी सांगावे की चारा घोटाळा, 2G घोटाळा यातील आरोपींच्या घरात पैसा सापडला होता का, अशी विचारणा भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपा