शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...अन् भाजपच्या खासदारानं साजरी केली 'नेताजी चंद्रशेखर बोस' जयंती

By कुणाल गवाणकर | Updated: January 24, 2021 14:00 IST

भाजपचे इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांचा प्रताप

भोपाळ: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती काल देशभरात साजरी झाली. बोस यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पक्षानं देशाच्या विविध भागांत 'पराक्रम दिवस' साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यात जाऊन नेताजी भवनला भेट दिली. त्यानंतर एका कार्यक्रमातदेखील सहभाग घेतला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील उपस्थित होत्या.संपूर्ण देशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी होत असताना भाजपचे इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी 'नेताजी चंद्रशेखर बोस' जयंती साजरी केली. बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लालवानी नेताजींसारखी टोपी घालून आले होते. मात्र भाषण देत असताना त्यांनी नेताजींना 'चंद्रशेखर आझाद' म्हटलं. त्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरलं आणि नेताजींना 'चंद्रशेखर बोस' म्हणाले. पण त्यांनी एकदाही त्यांच्या भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं नाही."काँग्रेसनं सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली; त्यांची लोकप्रियता नेहरू-गांधींपेक्षा अधिक होती"इंदूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लालवानी यांनी नेताजींच्या कर्तृत्त्वाचं वर्णन केलं. 'नेताजींनी नोकरी सोडून देशाची सेवा केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान दिलं. इंग्रजांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू करताच वेशांतर करून ते देशाबाहेर गेले आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांनी सैनिक गोळा केले. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. अशा नेताजी चंद्रशेखर आझाद... चंद्रशेखर बोस यांची जयंती आपण साजरी करत आहोत,' असं लालवानी भाषणात म्हणाले.''काँग्रेसच्या लोकांनी नेताजींचा खून केला''आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात होता, असं गंभीर आरोप साक्षी महाराज यांनी केला. काँग्रेसच्या लोकांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवल्याचं ते म्हणाले. बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त साक्षी महाराज उत्तर प्रदेशातल्या उन्नवमध्ये बोलत होते.

सुभाषचंद्र बोस यांचा अकाली मृत्यू झाला. काँग्रेसच्या लोकांनीच त्यांची हत्या घडवून आणली, असा माझा आरोप आहे. बोस यांची लोकप्रियता अतिशय जास्त होती. त्यांची लोकप्रियता पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा अधिक होती. बोस यांच्या लोकप्रियतेसमोर महात्मा गांधीही कुठेच नव्हते, असं साक्षी महाराज म्हणाले. 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी