शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

त्रस्त नवऱ्यांसाठी आयोग स्थापन करा; भाजपा खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 17:47 IST

खासदाराच्या मागणीनंतर लोकसभेत एकच हशा पिकला

नवी दिल्ली: पत्नीच्या त्रासामुळे मनस्ताप भोगणाऱ्यांसाठी पुरुष आयोगाची स्थापना करा, अशी मागणी भाजपाचेखासदार हरीनारायण राजभर यांनी केली आहे. लोकसभेत शून्य प्रहरात राजभर यांनी पुरुषांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला. महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर लोकसभेत एकच हशा पिकला. उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे खासदार हरीनारायण राजभर यांनी लोकसभेत पुरुषांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा मांडला. 'पत्नीच्या त्रासाचा सामना कराव्या लागणाऱ्या पुरुषांसाठी विशेष आयोग स्थापन करा,' असं राजभर लोकसभेत म्हणाले. या आयोगाला पुरुष आयोग असं नाव देण्यात यावं, असंदेखील ते म्हणाले. सरकारनं विविध समुदायांसाठी आयोग स्थापन केले आहेत. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला आयोगाचीही स्थापना करण्यात आली आहे. पण पुरुषांसाठी कोणताही आयोग नाही, असं राजभर यांनी म्हटलं. 'पत्नींकडून होणाऱ्या त्रासानं मनस्ताप सहन करणाऱ्या पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. पत्नींच्या आरोपांमुळे तुरुंगाची हवा खात असलेल्या पुरुषांचं प्रमाणदेखील मोठं आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरुष आयोगाची स्थापना करण्यात यावी,' असं राजभर म्हणाले. त्यांची मागणी ऐकून सभागृहातील अनेकांना हसू आवरता आलं नाही.  

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदारLoksabhaलोकसभा