शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे", ब्रीजभूषण सिंह यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 16:31 IST

manipur violence news : हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर राज्य सध्या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. 

नवी दिल्ली : मागील दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळणाऱ्या मणिपूरमधील क्रूरतेने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा देशाला लाजवेल अशी घटना घडली. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही जण २ महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढत असल्याचे दिसते. धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. महिलांची नग्न धिंड काढणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केले आहे. तर राजकारण न करण्याचे आवाहन सत्ताधारी करत आहेत.

विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशातच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी देखील या घटनेवर भाष्य केले आहे. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून महिला कुस्तीपटूंनी भाजपा खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. पण या प्रकरणात ब्रीजभूषण सिंह यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

मणिपूरमधील घटनेवर बोलताना सिंह यांनी पीटीआय या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले, "मणिपूरची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची दखल घेतली आहे. पण, ही घटना घडली आहे आणि खूपच निंदनीय आहे." 

ईशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासंदर्भात गृहमंत्री, अमित शाह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच, व्हिडीओ प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंहsexual harassmentलैंगिक छळBJPभाजपा