शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला कौल दिलाय, आता फक्त कागदोपत्री निर्णय राहिलाय”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:51 IST

Maharashtra Political Crisis: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर असून, दुसरा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, असे भाजप खासदाराने म्हटले आहे.

नवी दिल्ली: एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत असला, तरी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपसह शिंदे गटाला बहुतांश ठिकाणी मोठा विजय मिळाला आहे. यातच आता जनतेनेचे शिंदे गटाला स्विकारलेले असून, आता केवळ कागदोपत्री निर्णय राहिला असल्याची प्रतिक्रिया भाजप खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेला कौल दिलाय. लोकांनी बहुमताने या पॅनलच्या सदस्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, तो कागदोपत्री असेल, असे अनिल बोंडे यांनी सांगितले. शिवसेनेचे शिंदे गटातील लोक भाजपासोबत मैत्री करत आहेत, उद्धव ठाकरे गटानेही भाजपसोबत युती केल्यास तिला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. 

भाजप आणि दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे

निवडणूक आयोगाचे अधिकारी काय तो निर्णय घेतील. महाराष्ट्रातील जनतेने निर्णय करून टाकलाय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एक नंबरवर भाजप राहिला आणि दोन नंबरवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची एकनाथ शिंदेंची शिवसेना राहिली. लोकांनी स्वीकारलेय की हा भाजप आणि दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देईल, तो कार्यालयीन मॅटर आहे. लोकांच्या मनातले लोकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चंगाल्या प्रकारे दाखवून दिले असल्याचे बोंडे म्हणाले. 

दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे मोठे नुकसात झाले आहे. विदर्भात गडचिरोली, अमरावती, वर्धेत मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि विदर्भापर्यंत खूप नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी तत्काळ एनडीआरएफची टीमही पाठवली. मात्र यावेळी एनडीआरएफची मदतच मिळून उपयोग नाही  तर पायाभूत सुविधांचं नुकसान झालेय. पूल वाहून गेलेत, जमीन खरडून गेलीय. यासाठी मदत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा बोंडे यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAnil Bondeअनिल बोंडे