भाजपाचे आमदार विधानसभेत गुटख्याचे पाकीट फोडताना सापडले
By Admin | Updated: November 27, 2015 16:40 IST2015-11-27T16:37:43+5:302015-11-27T16:40:52+5:30
कर्नाटकातील भारतीय जनता पार्टीचे आमदार उमेश कट्टी विधानसभेत गुटख्याचे पाकीट फोडताना एका टीव्ही चॅनेल्या कॅमे-यात सापडल्याचे वृत्त आहे.

भाजपाचे आमदार विधानसभेत गुटख्याचे पाकीट फोडताना सापडले
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. २७ - कर्नाटकातील भारतीय जनता पार्टीचे आमदार उमेश कट्टी विधानसभेत गुटख्याचे पाकीट फोडताना एका टीव्ही चॅनेल्या कॅमे-यात सापडल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेचे कामकाज सुरु भारतीय जनता पार्टीचे आमदार उमेश कट्टी विधानसभेत गुटख्याचे पाकीट फोडताना एका टीव्ही चॅनेलच्या कॅमे-यात कैद झाले, यावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीका केली करत विधानसभेत गोंधळ घातला. त्यावर आमदार उमेश कट्टी यांनी खुलासा केला असून त्यांनी आपल्याला सुपारी खाण्याची सवय असल्याचे सांगितले. तसेच, मी विधानसभेत गुटख्याचे पाकिट फक्त फोडले होते, मात्र त्याठिकाणी मी खाल्ले नसल्याचेही आमदार उमेश कट्टी यांनी सांगितले.