शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo: यशस्वी होण्यासाठी महिला शॉर्टकट वापरतात- भाजपा आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 09:08 IST

भाजपाच्या महिला आमदाराचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: सध्या देशभरात मी टू चळवळीनं जोर धरला आहे. अभिनेत्री, पत्रकार त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला #MeToo मोहिमेच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. मात्र यावरुन भाजपाच्या महिला आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे. महिला त्यांच्या प्रगतीसाठी शॉर्टकट वापरतात, असं धक्कादायक विधान मध्य प्रदेशातील भाजपा आमदार उषा ठाकूर यांनी केलं आहे. महिला त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नैतिक मूल्यांशी तडजोड करतात. त्यामुळे त्या अडचणीत सापडतात. नैतिक मूल्यांशी तडजोड करुन यशस्वी होण्याला अर्थ नसतो, असं विधान ठाकूर यांनी केलं. त्यामुळे त्या वादात सापडल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर #MeToo चळवळ जोरात सुरू आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रातील महिलांनी अभिनेते, दिग्दर्शक, पत्रकार, राजकीय नेत्यांवर आरोप केले आहेत. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेलेल्या एम. जे. अकबर यांच्यावरदेखील अनेक महिला पत्रकारांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र राज्यमंत्री असलेले अकबर अडचणीत सापडले आहेत. याचबद्दल भाजपा आमदार उषा ठाकूर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना महिला यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट वापरतात, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं. एम. जे. अकबर पत्रकारितेत वरिष्ठ पदांवर असताना त्यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी केल्या आहेत. मात्र हे सर्व आरोप अकबर यांनी फेटाळले आहेत. 'माझ्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी प्रतिमा डागाळण्याच्या हेतूनं हे आरोप करण्यात आले आहेत,' असं अकबर यांनी म्हटलं आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच #MeToo वादळ कसं काय उठलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं यावरुन अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :Metoo CampaignमीटूBJPभाजपाM J Akbarएम. जे. अकबरsexual harassmentलैंगिक छळ