शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

'मतांची भीक मागणारे देतात इफ्तार पार्टी'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 6:50 PM

गोशमहलमधल्या भाजपा आमदारानं इफ्तार पार्टीवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह लोध यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.

हैदराबाद- गोशमहलमधल्या भाजपा आमदारानं इफ्तार पार्टीवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे आमदार टी राजा सिंह लोध यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. टी राजा म्हणाले, मी असं कोणत्याही इफ्तार पार्टीचं आयोजन करणार नाही. तसेच अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही.सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी हा मेसेज पाठवला आहे. रमझानच्या महिन्यात इतर नेते करतात, त्याप्रमाणेच माझ्या मित्रानं मला इफ्तार पार्टीचं आयोजन करण्याचा सल्ला दिला होता. तेलंगणाचे अनेक आमदार डोक्यावर टोपी घालून सेल्फी घेत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात मश्गुल आहेत. इफ्तार पार्टीमध्ये जे नेते जातात ते मतांसाठी भिकारी असतात. माझा विचार वेगळा आहे. हिंदू धर्मानं सर्वांचा आदर करण्याची शिक्षा दिली आहे. परंतु काही धर्म आणि त्यांची धार्मिक पुस्तके हिंदूंना मारण्याचं शिक्षण देत आहेत.जे हिंदूंना मारण्याची गोष्ट करतात, त्यांना मी कशी इफ्तार पार्टी देऊ. अशा इफ्तार पार्टीमध्ये मी कसा जाऊ शकतो. टी राजा सिंह यांनी ग्रीन बुकमध्ये याचा उल्लेख असल्याचंही अधोरेखित केलं आहे. हे ग्रीन बुकच भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे त्याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. त्यावर बंदी येण्यासाठी मी संघर्ष करत राहीन. मला अखंड हिंदू राष्ट्र, अयोध्येत राम मंदिर निर्माण, पूर्ण देशात गोहत्याबंदी, काश्मिरी पंडितांची पुनर्वापसीची स्वप्नं पडतात. जगभरात 50 मुस्लिम देश आणि 100 ख्रिश्चनांचे देश आहेत. मग हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही, असा सवालही त्या आमदारानं उपस्थित केला आहे.