शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जोडेपण खाल अन् कागददेखील दाखवाल; औवेसी यांच्या विधानावर भाजपा आमदाराचा इशारा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 20:29 IST

मी कागद दाखवणार नाही, छाती दाखवून गोळी मारायला सांगणार असं विधान औवेसी यांनी केलं होतं.

मेरठ - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशात आंदोलन पेटलं असताना एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केलेल्या विधानावर भाजपा नेत्याने टोला लगावला आहे. औवेसी यांना उत्तर देताना भाजपाचे आमदार संगीत सोम यांनी वादग्रस्त विधान केले आहे. औवेसी कागद दाखवतील अन् जोडेही खातील अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेरठच्या सरधना मतदारसंघाचे ते आमदार आहेत. 

औवेसी यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संगीत सोम म्हणाले की, मी कागद दाखवणार नाही, छाती दाखवून गोळी मारायला सांगणार असं औवेसी म्हणतात पण त्याचा फायदा नाही. जर तुम्हाला या देशात राहायचं असेल तर सरकार सांगेल तो कागद दाखवावा लागेल. जर औवेसी म्हणतात छातीवर गोळी खाण्यासाठी छाती कमी पडेल. तर त्यांना सांगतो, तुम्ही जोडेपण खाल अन् कागदपण दाखवाल असा इशारा त्यांनी दिला.  

औवेसी कुरनूलमध्ये काय बोलले?औवेसी यांनी रविवारी आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे आयोजित सभेत बोलताना सांगितले होते की, "मी देशात राहणार आहे, मी कागद दाखवणार नाही." जर कागद दाखविण्यास सांगितले तर छाती दाखवू अन् सांगू मार गोळी. माझ्या ह्दयावर गोळी घाला कारण त्या अंत: करणात भारताबद्दल प्रेम आहे, जे सरकारला समजू शकत नाही असं ते म्हणाले. 

बुरखा बंदी विधानावर पाठिंबायूपीचे राज्यमंत्री रघुराज सिंह यांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आलेल्या आणखी एका वादग्रस्त विधानास संगीत सोम यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले, 'बर्‍याच काळापासून बुरखा हा मुस्लिम स्त्रियांना त्रासदायक आहे. बुरखा म्हणजे महिलांवर बंदी. सर्व अयोग्य गोष्टी त्या वेशात घडत आहेत. बुरखा हा दहशतवादाचा पर्याय बनला आहे, बुरखा 100% बंद असणे आवश्यक आहे असं ते म्हणाले. 

रघुराज सिंह म्हणाले होते, 'बँकांमध्ये असे लिहिले आहे की बुरखा बंदी आहे. जर आपण बुरखा घालून गेलात तर सीसीटीव्हीवर येऊ शकणार नाही, आपला चेहरा लपला जाईल. आपली ओळख कळू शकणार नाही. शाहीन बागेत लोकांनी बुरखा घातला आहे. बुरखा म्हणजे चोरांना लपवण्याचे साधन आहे. दहशतवाद्यांकडून हे कवच मिळते. त्यामुळे बुरखा बंदी घालण्यात यावी असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMuslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा