शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मायावतींवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या भाजपाच्या महिला आमदाराचा माफीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 20:15 IST

बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजपा आमदार साधना सिंह यांनी आपला माफीनामा सादर केला आहे.

लखनौ : बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजपा आमदार साधना सिंह यांनी आपला माफीनामा सादर केला आहे. यामध्ये साधना सिंह यांनी असे म्हटले आहे की, मला कुणाला दुखवायचे नव्हते. मात्र, माझ्या भाषणातून कुणाला ठेच पोहोचली असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते, अशा शब्दांत साधना सिंह यांनी माफी मागितली आहे. 

चंदोलीमधील मुगलसराय मतदार संघातील आमदार असलेल्या साधना सिंह परनपुरा गावातील किसान कुंभ अभियान कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मायावतींवर टीका केली.  त्या म्हणाल्या, ''जेव्हा द्रौपदीचे वस्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. मात्र सपाने मायावतींचे वस्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे.''  मात्र, साधना सिंह एवढ्यावरच थांबल्या नाहीत. मायावती या ना पुरुष दिसतात ना स्त्री, असे अत्यंत आक्षेपार्ह  वक्तव्य त्यांनी केले. 

दरम्यान, भाजपाच्या महिला आमदारांनी केलेल्या या टीकेविरोधात बसपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असा टोला हसपा नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी लगावला आहे. भाजपा नेत्यांनी मायावतींविरोधात ज्या भाषेचा वापर केला आहे. तो त्यांची पातळी दाखवतो. सपा-बसपा आघाडी झाल्यानंतर भाजपा नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असे मिश्रा म्हणाले.

तसेच, याप्रकरणी चंदोली येथील बबुरी पोलीस स्टेशनमध्ये बसपा नेता रामचंद्र गौतम यांनी साधना सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाmayawatiमायावती