शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांनी मारहाण केलेल्या दलितांनी केला हिंदू धर्माचा त्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 08:46 IST

गेल्यावर्षी मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती.

अहमदाबाद: गुजरातच्या उना येथे जून 2016 मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आलेले दलित तरूण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्माचा त्याग केला आहे. उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी रविवारी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. या सोहळ्यात भिक्खुंकरवी 400 दलितांना बौद्ध धर्माची शपथ देण्यात आली. गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यातंर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर या दलित कुटुंबीयांच्या धर्मांतराला अधिकृत मान्यता मिळेल. गेल्यावर्षी मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती. गोरक्षकांच्या टोळक्याने त्यांची धिंड काढली होती, तसेच त्यांना एका कारला बांधून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावरून केंद्रातील मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काल या तरूणांनी अन्य काही दलित बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. तत्पूर्वी 25 एप्रिलला रमेश सरवय्या आणि अशोक सरवय्या यांच्यावर गोरक्षकांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला होता. 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेले हे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. यावेळी आरोपींकडून रमेश व अशोक यांना त्यांच्याविरुद्धचा गुन्हा मागे घेण्याची धमकी दिली. मात्र, त्याला नकार दिल्यानंतर आरोपी किरणसिंह दरबार व त्याच्या साथीदारांनी या दोघांवर हल्ला केला होता. मात्र, याठिकाणी लोक जमल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढावा लागला. दरम्यान बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर पीडित तरूणांचे वडील बाळू सरवय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आज मला मुक्त आणि सामर्थ्यशाली वाटत आहे. मी अंध रूढींना मुठमाती दिली आहे. ही भावनाच किती मुक्ततेची जाणीव करून देणारी आहे. मला मारहाण झाल्यानंतर माझ्यावर काही गोष्टींचे ओझे आहे, असे मला वाटत होते. मात्र, आता मी हे सर्व ओझे भिरकावून दिले आहे. यापुढे आम्हाला हवे ते करण्यापासून कोणताही देव किंवा देवता रोखू शकणार नाही. आम्ही शिक्षण घेऊ, स्वत:ला सुशिक्षित करू आणि योग्य तो व्यवसाय निवडू, असे बाळू सरवय्या यांनी सांगितले. 

टॅग्स :Dalit assaultदलितांना मारहाणcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचार