शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आपलंच सरकार ऐकेना! मुंबईतील भाजप आमदार अमित शहांच्या भेटीला गेले; जुनीच विनंती पुन्हा करून आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 20:59 IST

जानेवारी २०१८ मध्ये केलेली मागणी अद्याप पूर्ण नाही; केंद्राकडे पुन्हा विनंती

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रताप लोढा यांनी गृहमंत्री अमित शहांची आज दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी शहांकडे एक महत्त्वाची मागणी केली. मुंबईतील जिन्ना हाऊसचं रुपांतर दक्षिण आशिया कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्याची मागणी लोढा यांनी शहांकडे केली. पाकिस्तानचे राष्ट्रपिता मोहम्मद अली जिन्ना यांच्यामुळे देशाची फाळणी झाली. त्यामुळे जिन्ना हाऊस म्हणजे फाळणीमागील कटाची आठवण करून देणारं ठिकाण असल्याचं लोढा यांनी याआधी म्हटलं आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले मंगल प्रभात लोढा विधानसभेत मलबार हिल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. जिन्ना हाऊस याच मतदारसंघात येतं. मोहम्मद अली जिन्ना यांच्यामुळे देशाची फाळणी झाली. त्यामुळे त्याचं निवासस्थान फाळणीच्या जखमांची आठवण करून देणारं आहे, अशी भूमिका लोढा यांनी मांडली. जिन्ना हाऊसचं रुपांतर दक्षिण आशिया कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्यात यावं अशी मागणी लोढा यांनी गृहमंत्री शहांकडे केली. 

जिन्ना हाऊसचं रुपांतर कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्याची मागणी लोढा यांनी २०१८ मध्येही केंद्राकडे केली होती. 'जिन्ना हाऊस देशाच्या फाळणीच्या कटकारस्थानाचं प्रतीक आहे. त्यामुळे त्याचं रुपांतर कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्यात यावं. जिन्ना हाऊसला 'दक्षिण आशिया कला आणि सांस्कृतिक केंद्र' करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारनं सुरू करावी' अशी मागणी लोढा यांनी जानेवारी २०१८ मध्येही केली होती. त्यासाठी त्यांनी संबंधित पदाधिकारी आणि मंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र साडे तीन वर्षांमध्ये त्यांची ही मागणी पूर्ण झालेली नाही. 

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाAmit Shahअमित शहा