शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

'बुखारींचं काय झालं लक्षात आहे ना?'; भाजपा आमदाराची पत्रकारांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 19:10 IST

माजी कॅबिनेट मंत्री चौधरी लाल सिंह यांची धमकी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी राहिलेले भाजपा नेते चौधरी लाल सिंह यांनी पत्रकारांना धमकी दिली आहे. राज्यातील पत्रकारांनी स्वत:साठी एक मर्यादारेषा आखून घ्यावी. शुजात बुखारी यांचं काय झालं हे सर्वांच्या लक्षात आहेत ना?, असं म्हणत सिंह यांनी पत्रकारांना इशारा दिला. बुखारी यांची गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीविषयी भाजपा नेते चौधरी लाल सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'काश्मीरचे पत्रकार जम्मूतील परिस्थिती चुकीच्या पद्धतीनं जनतेसमोर मांडत आहेत. काश्मीरमधील पत्रकारांनी याठिकाणी चुकीचं वातावरण तयार केलं आहे. त्यांना इकडे कशी परिस्थिती हवी आहे? शुजात बुखारी यांचं काय झालं तुम्हाला माहित आहे ना?' असं म्हणत सिंह यांनी पत्रकारांना धमकी दिली. 'पत्रकारांनी मर्यादा पाळल्यास राज्यातील बंधुभाव कायम राहिल. राज्याची प्रगती होईल,' असंही सिंह म्हणाले. याआधी सिंह यांनी कठुआ बलात्कार प्रकरणाविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. श्रीनगरमध्ये 14 जून रोजी पत्रकार वसाहतीजवळ शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बुखारी स्थानिक वृत्तपत्र रायझिंग काश्मीरचे संपादक होते. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. याआधी याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये औरंगजेब या जवानाचं अपहरण करण्यात आलं. या जवानाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांमुळे काश्मीरमधील परिस्थिती बिघडली असताना 19 जून रोजी भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJP-PDPभाजपा-पीडीपीBJPभाजपा