शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 10:44 IST

माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी मंत्री विजय शाह हे धावतच भाजपा प्रदेश कार्यालयात गेले

भोपाळ - पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर या ऑपरेशनची माहिती जाहीर करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत भाजपाच्या मंत्र्‍याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्याने भाजपा मंत्र्याचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह यांना भाजपा कार्यालयाने तात्काळ बोलावून घेतले. या प्रकरणी त्यांनी माफी मागितली आहे. वरिष्ठांनी शाह यांना फटकारल्यानंतर ते पळत पळत पक्षाच्या कार्यालयात पोहचले.

माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी मंत्री विजय शाह हे धावतच भाजपा प्रदेश कार्यालयात गेले. शाह यांच्या विधानाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही याबाबत प्रदेश कार्यालयाकडे अहवाल मागितला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश संघटन मंत्री हितानंद शर्मा आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष वी.डी शर्मा यांनी मंत्री शाह यांना चांगलेच फटकारले. शाह यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे माफी मागितली. त्यासोबत माध्यमांसमोर येऊन मी बहीण सोफियाची हजारवेळा माफी मागतो असं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी सोमवारी इंदूर येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी शाह यांनी दहशतवाद्यांची बहीण म्हणून कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख केला. या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला. त्यानंतर विरोधी पक्षासह सोशल मिडिया युजरनेही भाजपा नेत्याची खरडपट्टी केली. मात्र शाह यांच्या विधानामुळे भाजपाची गोची झाली. 

व्हायरल व्हिडिओनंतर त्याची गंभीर दखल भाजपाच्या वरिष्ठांनी घेतली. त्यानंतर शाह यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माध्यमांना सांगितले की, माझ्या पूर्ण कुटुंबाला सैन्याची पार्श्वभूमी आहे. कारगिलपासून अनेक ठिकाणी आमच्या घरातील लोक शहीद झालेत. मी स्वप्नातही सैनिकांचा अपमान करण्याचा विचार करू शकत नाही. तरीही माझ्याकडून अनावधानाने कुणाचा, कुठल्या समाजाचा अपमान झाला असेल तर दहा वेळा माफी मागण्यास तयार आहे. बोलण्याच्या ओघात माझ्या तोंडून चुकीचे विधान झाले अशी कबुली त्यांनी दिली. मात्र पक्षाकडून मला इतर कारणासाठी बोलावले होते असा दावा शाह यांनी केला. मंत्री विजय शाह यांच्या विधानामुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपा नेत्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपाIndian Armyभारतीय जवान