शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींच्या रॅलीला न येणारा देशद्रोही' असं म्हणणारा केंद्रीय मंत्रीच रॅलीला गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 17:31 IST

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह मोदींच्या रॅलीला अनुपस्थित

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह कायम त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. गिरीराज त्यांच्या विधानांमुळे अनेकदा अडचणीतही सापडले आहेत. मात्र आता त्यांच्यासमोर एक वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल बिहारमध्ये होते. तिथे त्यांनी पाटण्यात एका रॅलीली संबोधित केलं. या रॅलीच्या आधी गिरीराज यांनी केलेलं विधान चर्चेत होतं. मोदींच्या रॅलीला न येणारे देशद्रोही असतील, असं गिरीराज म्हणाले होते. त्यावरुन त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. मात्र गिरीराज सिंह स्वत:च मोदींच्या रॅलीला न गेल्यानं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.काल पाटण्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली. या सभेला गिरीराज सिंह अनुपस्थित होते. त्यांनी याबद्दलची माहिती ट्विटरवरुन दिली. यानंतर गिरीराज सिंह सोशल मीडियावर ट्रोल झाले. गिरीराज यांचं आधीचं विधान आणि त्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं. तीन मार्चला होणाऱ्या पाटण्याच्या गांधी मैदानात होत असलेल्या मोदींच्या सभेला जो अनुपस्थित राहील, तो देशद्रोही असेल, असं गिरीराज काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. यापुढे जाऊन रॅलीतील उपस्थितीवरुन कोण हिंदुस्तानासोबत आहे आणि कोण पाकिस्तानसोबत आहे हे स्पष्ट होईल, असंदेखील गिरीराज यांनी म्हटलं होतं. जे हिंदुस्तानासोबत आहेत, ते मोदींच्या रॅलीला उपस्थित राहतील आणि जे पाकिस्तानच्या बाजूनं आहेत, ते मोदींच्या रॅलीला अनुपस्थित राहतील, असं गिरीराज म्हणाले होते. त्यांच्या या विधानाबद्दल संयुक्त जनता दलानं आक्षेप नोंदवला होता. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलानं भाजपावर निशाणा साधला होता. मात्र मोदींच्या रॅलीतील अनुपस्थितीवरुन देशद्रोही ठरवणारे गिरिराज सिंह स्वत:च रॅलीला हजर नसल्यानं याची मोठी चर्चा झाली. प्रकृती अस्वस्थ असल्यानं मोदींच्या रॅलीला जात नसल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPakistanपाकिस्तान