शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

रायबरेलीतील रस्त्यांच्या कामाबद्दल सोनिया गांधींनी दिले गडकरींना धन्यवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 11:54 IST

सोनिया गांधी लोकसभेत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 10 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांनी केंद्रीय भूपृष्ठवहन , रस्ते महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितिन गडकरी यांना हे पत्र लिहिले आहे.

नवी दिल्ली- दुसऱ्या पक्षाचे सरकार सत्तेमध्ये आल्यावर आपल्या मतदारसंघांमधील विकासकामे थंडावतात असा बुहतांश नेत्यांचा अनुभव असतो. काही नेत्यांना यामध्ये आपल्या भागाला मुद्दाम डावलल्याची शंकाही येते. तसे आरोपही नेते करतात.काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघांमधील कामे पूर्ण होण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकारमधील मंत्र्यांना वारंवार पत्रे लिहून पाठपुरावा केला होता. आता मात्र त्यांनी पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या विनंतीला योग्य प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी गडकरी यांना धन्यवाद दिले.सोनिया गांधी लोकसभेत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 10 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांनी केंद्रीय भूपृष्ठवहन , रस्ते महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितिन गडकरी यांना हे पत्र लिहिले आहे. आपल्या भागातील रस्त्यांचा प्रश्न सोनिया गांधी यांनी मांडला होता, त्याला गडकरी यांनी 'सकारात्मक प्रतिसाद' दिल्याबद्दल सोनिया यांनी आभार मानले आहेत. मार्च महिन्यामध्ये सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग 330 ए च्या चौपदरीकरणाबद्दल हे पत्र लिहिले होते. या महामार्गाचा 47 किमी भाग रायबरेली मतदारसंघात येतो. सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग 232, 232 ए आणि 330 ए यांचाही चौपदरीकरणाचा विचार करावा असे पत्रात लिहिले होते.त्यानंतर पाच महिन्यांनंतर 20 जुलौ 2018 रोजी गडकरी यांनी आपल्या विनंतीनुसार तज्ज्ञांद्वारे पाहाणी करुन रायबरेलीतील रस्त्याचे चौपदरीकरणाच्या शक्यतेबद्दल कळवले. तसेच सोनिया गांधी यांनी माहिती दिलेल्या सर्व रस्त्यांचे चौपदरीकरण करणे शक्य असल्याचेही त्यांनी पत्रातून कळवले. सोनिया गांधी यांनी याबद्दलच गडकरी यांचे आभार मानले आहेत. सोनिया गांधी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना रायबरेलीमध्ये एक एम्स रुग्णालय स्थापन केले जावे यासाठी पत्र लिहिले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रायबरेलीतील पूरग्रस्त क्षेत्राबाबत पत्र लिहिले होते. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकUttar Pradeshउत्तर प्रदेश