शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 18:38 IST

BJP membership campaign : या अभियानांतर्गत कोणाला पक्षाचे सदस्य व्हायचे असेल तर तो घरी बसून ऑनलाइन पद्धतीने सदस्य होऊ शकतो.

BJP membership campaign : नवी दिल्ली : २५ सप्टेंबर रोजी भाजप सदस्यत्व अभियान राबवणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील एक कोटी लोकांना जोडण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. २५ सप्टेंबरला पक्ष केंद्र, राज्य, जिल्हा, विभाग ते बूथ स्तरापर्यंत सदस्यत्व अभियानाची विशेष मोहीम राबवणार आहे. दरम्यान, हा दिवस भाजपचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिवस आहे.

भाजपने देशभरात मेगा सदस्यत्व अभियान सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचे पहिले सदस्य बनून सुरुवात केली. भाजपच्या या प्रचारात अधिकाधिक लोक सहभागी होत आहेत. या अभियानांतर्गत देशभरातून जो कोणी भाजपचा सदस्य होईल, त्याची संपूर्ण कुंडली पक्षाकडे असणार आहे. 

दरम्यान, या अभियानांतर्गत प्रत्येक राज्याला सदस्य बनवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. या अभियानात एआयचाही वापर केला जात आहे, जेणेकरून एकाच व्यक्तीला दोनदा पक्षाचे सदस्य होण्यापासून रोखता येईल. तसेच, या अभियानांतर्गत कोणाला पक्षाचे सदस्य व्हायचे असेल तर तो घरी बसून ऑनलाइन पद्धतीने सदस्य होऊ शकतो.

कसे बनतील सदस्य?भाजपची ही सदस्यत्व मोहीम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत मिस्ड कॉल, नमो ॲप, वेबसाइट आणि क्यूआर कोड स्कॅन करून कोणतीही व्यक्ती सदस्य होऊ शकते. भाजपात कोणतीही व्यक्ती केवळ सहा वर्षे पक्षाचा सदस्य राहू शकते. सहा वर्षानंतर पुन्हा सभासदत्व घ्यावे लागते. भाजप दर पाच वर्षांनी सदस्यत्व अभियान राबवते. 

यावेळी भाजपने १० कोटी नवीन सदस्य बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे अभियान ५१ दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे पक्षाला ५१ दिवसांत सर्व कामे पूर्ण करायची आहेत. पक्षाने २०१४ मध्ये सदस्यत्व मोहीम सुरू केली तेव्हा ११ कोटींहून अधिक सदस्य जोडले गेले आणि हे अभियाना जवळपास सहा महिने चालले होते.

टॅग्स :BJPभाजपा