मुंबई नाका येथे भाजपा सभासद नोंदणी
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:19+5:302015-02-14T23:52:19+5:30
नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ मुंबई नाका, सावित्रीबाई फुले चौकात माजी आमदार वसंत गिते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सभासद नोंदणी करतानाच, पक्षाचे कार्य व केंद्र-राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती सामान्य जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई नाका येथे भाजपा सभासद नोंदणी
न शिक : भारतीय जनता पार्टीच्या सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ मुंबई नाका, सावित्रीबाई फुले चौकात माजी आमदार वसंत गिते यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सभासद नोंदणी करतानाच, पक्षाचे कार्य व केंद्र-राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती सामान्य जनतेपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. सभासद नोंदणी मोहिमेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा याठिकाणी घेण्यात आला. पक्षाने सभासद नोंदणीसाठी उद्दिष्ट ठरवून दिलेले असले तरी, त्यापेक्षा अधिक संख्येने सभासद कसे होतील, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यात सामावून घ्यावे, असे आवाहनही गिते यांनी केले. यावेळी सुरेश अण्णा पाटील, गिरीश पालवे, प्रशांत जाधव, सचिन ठाकरे, रणजित नगरकर, बापू सोनवणे, काशीनाथ मेंगाळ, देवकिसन पारीख, अनिल भालेराव आदि उपस्थित होतेे. सूत्रसंचालन अनिल वाघ यांनी, तर आभार जगदीश पाटील यांनी मानले.