शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:03 IST

BJP And Mamata Banerjee : भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्येही हिंदू असुरक्षित आहेत, तर मुख्यमंत्री गप्प आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे. बांगलादेशच्या मुद्द्याबाबत भाजपा नेते दिलीप घोष यांनी सांगितलं की, देशाच्या फाळणीपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घटनांवर पूर्णपणे गप्प आहेत. सरकारही कोणतीही कारवाई करत नाही.

एसआयआरच्या मुद्द्याबाबत भाजपा नेता म्हणाले की, पश्चिम बंगालमधील परिस्थिती खूप गंभीर आहे. एसआयआरबाबत सुनावणी सुरू असताना मोठ्या प्रमाणात नावं मतदार यादीतून वगळली जाण्याची अपेक्षा आहे. ओडिशामध्ये बांगलादेशी असल्याच्या संशयावरून पश्चिम बंगालच्या एका मजुराच्या हत्येवरही दिलीप घोष यांनी प्रतिक्रिया दिली. अशा घटना घडतात हे निंदनीय आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं आहे.

दिलीप घोष यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणावरही मत व्यक्त केलं. कुलदीप सेंगरच्या जामिनाबद्दल त्यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आहे आणि तेथील सरकार या प्रकरणात आपली भूमिका बजावेल. यापूर्वी भाजपाने आरोप केला होता की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर आणि भारतीय पुनर्जागरणाचे जनक राजा राममोहन रॉय यांची भूमी हळूहळू पश्चिम बांगलादेशात रूपांतरित होत आहे.

भाजपाच्या बंगाल युनिटने "एक्स" पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "ममता बॅनर्जी यांच्या "बंगालीविरोधी राजवटीत" फिरहाद हकीम, जमात-ए-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष सिद्दीकुल्लाह चौधरी आणि बाबरी मशिदीचे बांधकाम करणारे हुमायून कबीर हे इस्लामी राज्य ताब्यात घेत आहेत. हे सर्वजण टीएमसीशी संबंधित आहेत. बंगाली भाषा आणि संस्कृतीचा नाश करणं हा आता लपलेला अजेंडा राहिलेला नाही. तो पूर्णपणे उघड आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : BJP: Hindus unsafe in Bengal; accuses Mamata Banerjee government.

Web Summary : BJP alleges Hindus are unsafe in West Bengal under Mamata Banerjee's rule, citing inaction on atrocities. They criticized her silence on issues like Bangladeshi infiltration and voter list discrepancies, raising concerns about Bengal's changing identity.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेशHinduहिंदूPoliticsराजकारण