शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पंजाबमध्ये भाजपा 65-70 जागा लढवण्याची शक्यता; अमरिंदरसिंग यांच्याशी युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 09:59 IST

, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण?

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार जाहीर करायचा की १० मार्च रोजी निकाल जाहीर होतील तोपर्यंत वाट बघायची, याचा निर्णय भाजपचे श्रेष्ठी घेणार आहेत.  राज्यात भाजप माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पक्षाशी व सुखदेव सिंग धिंडसा यांच्याशी युती करून ६५-७० जागा लढवण्याची शक्यता आहे. भाजप आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार का किंवा युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमरिंदरसिंग असतील, हे अजून स्पष्ट नाही.

पंजाबमध्ये भाजपने गेल्या ४० वर्षांत २३ पेक्षा जास्त जागा लढवलेल्या नाहीत आणि लढवल्या त्याही अकाली दलाचा दुय्यम सोबती या भूमिकेत. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ३ जागा जिंकता आल्या. तीन कृषी कायद्यांवरून अकाली दल केंद्र सरकारमधून बाहेर पडल्यानंतर भाजप राज्यात स्वबळावर पाय रोवण्याच्या प्रयत्नांत आहे.

भाजप अमरिंदरसिंग यांच्या पक्षासाठी आणि धिंडसा यांच्या गटाला ५० जागा सोडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जनमत चाचण्यांत आम आदमी पक्ष (आप) प्रमुख दावेदार म्हणून समोर आल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. ‘आप’ला रोखण्यासाठी भाजप काही मोजक्या मतदारसंघांत अकाली दलाशी संपर्क साधू शकतो. 

भांडणामुळे पेचमुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात भांडण असल्यामुळे चेहरा जाहीर करण्याचा पेच काँग्रेससमोरही आहे.

स्वबळावर लढायचे होते; पण...या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढून आपल्याच शक्तीची चाचणी भाजपला करायची होती. परंतु, कोणालाच बहुमत मिळाले नाही तर काय होईल याची कोणालाच खात्री नाही. १८ जानेवारी रोजी ‘आप’ आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची शक्यता आहे व बहुतेक ते लोकसभा सदस्य भगवंत सिंग मान असतील. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा