शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:48 IST

BJP Leader's Suspicious Death In West Bengal: पश्चिम बंगालमधील आरामबाग येथील गोघाट येथे भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत राहत्या घरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे दोन्ही हात बांधलेले असल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमधील आरामबाग येथील गोघाट येथे भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत राहत्या घरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहाचे दोन्ही हात बांधलेले असल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी त्यांची हत्या करून मृतदेह फासाला लटकवण्यात आल्याचा आरोप केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

याबाबत मिळालेल्या शनिवारी सकाळी ७ वाजता भाजपाच्या शेख बकीबुल्ला  नावाच्या कार्यकर्त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली. ही घटना हुगळी जिल्ह्यातील गोघाटमधील सानबंदी परिसरात घडली. मृत शेथ बकीबुल्ला हे गोघाटमधील अल्पसंख्याक मोर्चाचे मंडळ अध्यक्ष होते. आज सकाळी कुटुंबातील सदस्य उठले. तेव्हा त्यांना बकीबुल्ला यांचा मृतदेह घराच्या बाल्कनीमध्ये लटकलेल्या स्थितीत सापडला. तसेच त्यांचे दोन्ही हातही बांधलेले होते.

दरम्यान बकीबुल्ला यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच ही एक राजकीय हत्या असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोघाट पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान, त्यांना स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला. पक्षाचे वरिष्ठ नेते घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. आता या प्रकरणाचा योग्य तो तपास करण्यात यावा अशी मागणी भाजपाच्या नेत्यांसह कुटुंबीयांनी केली आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी