शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेते म्हणतायत, लोकसभेसाठी आमचे मिशन 48...; पत्रकाराच्या प्रश्नाला CM शिंदेंनी दिलं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 18:33 IST

"अजित दादा मला स्वतः म्हणत होते की, तुम्ही दोघे छान काम करत आहात..."

आगामी लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. यातच, भाजप नेते तथा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे ‘मिशन 48’ असून, आमचे सर्वच्या सर्व 48 मतदार संघांवर लक्ष असणार आहे, असे म्हटले आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. ते दिलीत नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. 

भाजपचे काही नेते म्हणत आहेत, की लोकसभेसाठी त्याचे मिशन 48 आहे? असा प्रश्न विचारला असता, शिंदे म्हणाले, "मिशन 48 बरोबर आहे ना. शिवसेना-भाजप युतीचे मिशन 48 आहेच. शिवसेना भाजप युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. त्यामुळे शिवसेना भाडप युती मजबुतीने काम करेल, वाटचाल करेल आणि मला वाटते, की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, आपल्याला यासंदर्भात सांगितले आहे."

"अजित दादा मला स्वतः म्हणत होते की, तुम्ही दोघे छान काम करत आहात" -यावेळी, अजीत दादा म्हणत आहेत, की मुख्यमंत्री फक्त एकच शब्द बोलत आहेत की विस्तार लवकरच होईल. त्या पलिकेडे काही होत नाही, असे विचारण्यात आले असता मुख्यमंत्री म्हणाले, आता काय त्यांना तारीख...,  माहीत पडेलना तुम्हाला. अजित दादा मला स्वतः म्हणत होते की, तुम्ही दोघे छान काम करत आहात, लवकर लवकर निर्णय घेत आहात. मी म्हणालो, की तुम्हीच सांगत आहात, की लवकर करा मंत्रिमंडळ. ते भेटले ना मला. अतिवृष्टीत पिकांचे जे काही नुकसान झाले, त्यासंदर्भात प्रश्न घेऊन आले होते. तसेच, ते विरोधी पक्ष नेते असले, तरी आमचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

फ्रेंडशीप डे सर्वांसाठीच असतो, माझ्या सर्वांनाच शुभेच्छा -पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने, आपल्या गटातील आमदार म्हणत आहेत, की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री पुन्हा पाहायला मिळावी, आम्हाला आनंद होईल, असे विचारले असता, फ्रेंडशीप डे सर्वांसाठीच असतो, माझ्या सर्वांनाच शुभेच्छा आहेत. असे शिंदे म्हणाले. यावेळी, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाजप-शिवसेना फॉर्म्युला ठरलायका, असे विचारले असता, तुम्हाला आता सांगितलं तर तुमची उत्सुकता संपून जाईल ना. तुम्ही आम्हाला मधे मधे विचारणारच नाही. त्यामुळे लवकर होऊन जाईल, अेस शिंदे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाraosaheb danveरावसाहेब दानवे