शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...म्हणून राज्यातील भाजप नेते दिल्लीला गेले होते; अखेर समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 09:43 IST

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार गैरहजर

- विकास झाडेनवी दिल्ली : दिल्लीत डेरेदाखल झालेल्या भाजपच्या कोअर टीममधील नेत्यांनी सोमवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बैठक घेतली, त्याला ‘फक्त दुपारचे जेवण’ असे नाव देण्यात आले. रात्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरी भोजनासोबत संगीत मैफलीचा आनंद घेतला. माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार हे मात्र गैरहजर होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्येक राज्यातील संघटनेमधील महत्त्वाचे नेते आणि केंद्र सरकार यांच्यात सुसंवाद वाढवण्यात यावा, अशा सूचना दिल्या. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशभरातील सर्व प्रदेश अध्यक्षांना कोअर टीमच्या नेत्यांसह दिल्लीचे आमंत्रण दिले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात या भेटीगाठी घ्यायच्या असल्याने पहिल्या टप्प्यात राजस्थान, उत्तर प्रदेश उरकले. हा आठवडा महाराष्ट्राचा होता.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेत्यांच्या दिल्ली भेटीचे नियोजन केले. शनिवारपासूनच ते दिल्लीत आले आहेत, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिल्लीत आले आहेत. विशेष म्हणजे ते महाराष्ट्र सदनाला फाटा देत बाहेर हॉटेलमध्ये थांबले आहेत. अन्य कोअर टीमचे सदस्यही दिल्लीत आहेत. प्रारंभी नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांची या मंत्र्यांची कोअर टीमने भेट घेतली. काहींची भेट गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही झाली. सोमवारी दुपारी हे नेते नितीन गडकरी यांच्या घरी जेवणाला जमले. यात चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे होते. यावेळी राज्यातील राजकीय तसेच संघटनात्मक स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटीपुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.दानवे यांच्या निवासस्थानी नवीन केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. हे चारही मंत्री १६ ते २४ ऑगस्टपर्यंत त्यांच्या विभागात संपर्क यात्रा काढून मोदींनी केलेल्या कामांची उजळणी करणार आहेत.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा