शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

संकटाच्या काळात भाजपचे नेते गायब होतात; राज्यात चक्रीवादळ आले तेव्हा कुठे होते? ममतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 4:20 AM

पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात.

गडबेता (प. बंगाल) : अम्फान चक्रीवादळानंतर आमच्या सरकारने लोकांना सर्वतोपरी मदत केली. मात्र, भाजपचे नेते संकटाच्या काळात कुठेच दिसले नाहीत, अशा शब्दांत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. (BJP leaders disappear in times of crisis Mamata's attack)पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना तृणमूलच्या सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केली. एखादा अपवाद असू शकतो. मात्र, आम्ही लोकांच्या मदतीसाठी पोहोचलो तेव्हा भाजपचे लोक कुठे होते, असा सवाल करून त्या म्हणाल्या की, संकटाच्या काळात ते नेहमीच गायब असतात. प. बंगालमध्ये एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) लागू होऊ देणार नाही. कारण, नोंदणी करताना लोक जर घरी नसतील, तर भाजप मतदारांची नावे हटवून टाकेल. देशातील कोणत्याही नागरिकाला प. बंगालमधून बाहेर काढले जाणार नाही. भाजप हा दंगेखोरांची पार्टी आहे, असे सांगत त्या म्हणाल्या की, आम्हाला हिंसा नकोय. रक्तपात नकोय. राज्यात सूडाचे राजकारण आम्हाला नकोय. 

मुकुल रॉय वीस वर्षांनंतर विधानसभेच्या रिंगणात- भारतीय जनता पक्षाने अखेरच्या चार टप्प्यांमधील १५९ पैकी १४८ उमेदवारांची यादी गुरुवारी जारी केली. त्यात तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणारे हेवीवेट नेते मुकुल रॉय व त्यांचे चिरंजीव शुभ्रांगशू, आणखी की विद्यमान खासदार जगन्नाथ सरकार आदींचा समावेश आहे. 

- मुकुल रॉय हे वीस वर्षांनंतर विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकत्यामधील भवानीपूर मतदारसंघात भाजपने अभिनेता रूद्रनील घोष यांना उतरवले आहे. त्यांचा सामना तृणमूलचे ज्येष्ठ नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्याशी आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपा