तृणमूल काँग्रेसने काही केले तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार: शुभेंदू अधिकारी

By देवेश फडके | Published: February 15, 2021 10:17 AM2021-02-15T10:17:40+5:302021-02-15T10:19:23+5:30

पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केलेल्या शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार असल्याचा दावा केला आहे.

bjp leader suvendu adhikari says people of west bengal have decided to vote for double engine govt | तृणमूल काँग्रेसने काही केले तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार: शुभेंदू अधिकारी

तृणमूल काँग्रेसने काही केले तरी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार: शुभेंदू अधिकारी

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये भाजपचीच सत्ता येणार - अधिकारीतृणमूल काँग्रेसचा फारसा प्रभाव राहणार नाही - अधिकारी२०१९ मध्ये हाफ, २०२१ मध्ये साफ - अधिकारी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी ढवळून निघताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच येणार असल्याचा दावा केला आहे. (bjp leader suvendu adhikari says people of west bengal have decided to vote for double engine govt)

पश्चिम बंगालमधील जनतेने भाजपला मत देण्यासाठी मन बनवले आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणार आहे. तृणमूल काँग्रेसने काहीही केले, तरी आता फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी '२०१९ मध्ये हाफ, २०२१ मध्ये साफ', असा नारा दिला आहे, असेही शुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी सांगितले.

नजरकैदेत ठेवल्याचा ओमर अब्दुल्लांचा दावा, ट्वीटमध्ये लिहिले  ‘ये नया काश्मीर’

भारत माता की जय आणि जय श्रीराम

काही वर्षांपूर्वी 'जय बांगला'चा नारा तृणमूल काँग्रेसकडून देण्यात आला होता. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालचा बांगलादेश करू इच्छिते. मात्र, आमचा नारा भारत माता की जय आणि जय श्रीराम असा आहे. या विधानसभा निवडणुकीत केंद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचे डबल इंजिन असलेले सरकार येईल, असा विश्वास अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, शुभेंदू अधिकारी हे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी होते, असे सांगितले जाते. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर आता शुभेंदू अधिकारी हेदेखील याच ठिकाणाहून निवडणूक लढतील, असे सांगितले जात आहे. ममता बॅनर्जी यांना तब्बल ५० हजार मतांनी पराभूत करू, असा दावा अधिकारी यांनी केला आहे. २०१६ पासून नंदीग्राम येथून आमदार असलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

Web Title: bjp leader suvendu adhikari says people of west bengal have decided to vote for double engine govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.