शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भाजप नेत्याची हत्या, कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी केला गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 10:23 IST

सुरेंद्र मटियाला हे भाजपचे स्थानिक नेते होते आणि त्यांनी 2017 मध्ये नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती.

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) बिंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मटियाला रोडवरील भाजप (BJP) नेते सुरेंद्र मटियाला (Surendra Matiala)  यांची शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. 

शुक्रवारी संध्याकाळी 7.45 च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, सुरेंद्र मटियाला यांची निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासादरम्यान असे आढळून आले की, दोन अज्ञात हल्लेखोर हेल्मेट घालून कार्यालयात घुसले आणि त्यांनी मटियाला यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी जवळपास 8-10 राऊंड फायर केले, त्यापैकी 4 गोळ्या सुरेंद्र मटियाला यांना लागल्या.

दरम्यान,  सुरेंद्र मटियाला यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. कार्यालयात उपस्थित लोकांनी सुरेंद्र मटियाला यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेंद्र मटियाला यांना मृत घोषित केले. सुरेंद्र मटियाला हे भाजपचे स्थानिक नेते होते आणि त्यांनी 2017 मध्ये नगरसेवकपदाची निवडणूकही लढवली होती.

सुरेंद्र मटियाला यांचे चुलत भाऊ आणि प्रत्यक्षदर्शी राम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यावेळी कार्यालयात एकूण 4 लोक उपस्थित होते. ज्यामध्ये राम सिंह यांच्यासह इतर दोन लोक बसून बोलत होते तर सुरेंद्र मटियाला हे टीव्ही पाहत होते. यादरम्यान, दोन जण कार्यालयात घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. राम सिंह म्हणाले की, सुरेंद्र मटियाला यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, पोलीस या प्रकरणाच्या तपास करत असून कार्यालयाभोवती बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी