शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची दहशतवाद्यांकडून हत्या; घरात घुसून झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 08:00 IST

पोलिसांकडून मारेकरी दहशतवाद्यांचा शोध सुरू

श्रीनगर: दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गुल मोहम्मद मीर यांची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. तीन दहशतवादी मीर यांच्या नौगाम वोरिनाममधील घरात घुसले होते. त्यांनी मीर यांच्याकडे त्यांच्या गाडीची चावी मागितली आणि गाडी घेऊन जाताना मीर यांच्यावर गोळ्या झाडल्या. शनिवारी रात्री ही घटना घडली. परिसरात अटल नावानं ओळखल्या जाणाऱ्या गुल मोहम्मद मीर यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. मीर यांच्या हत्येबद्दल भाजपाकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यातली शांतता भंग करणाऱ्यांविरोधात आणि निष्पापांच्या हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी मीर यांच्या हत्येचा निषेध केला. 'मी या निर्घृण हत्येचा निषेध करतो. गुल मोहम्मद मीर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य मिळो,' असं अब्दुल्ला म्हणाले. पीडीपीच्या अध्यक्षा मुफ्ती आणि जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे. ए. मीर  यांनीही मीर यांच्या हत्येचा निषेध केला.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाterroristदहशतवादी