शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाषण थांबवल्यानं दिलीप गांधी भावुकच झाले, पण 'हा' नेता तर स्टेजवर रडायलाच लागला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 11:41 IST

काही दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी भाषण थांबवल्याने  भावुकच झाले होते. असाच एक प्रकार हरयाणातील पलवलमध्ये पाहायला मिळाला आहे

ठळक मुद्देव्यासपीठावर बोलण्याची संधी न मिळाल्याने एका भाजपा नेत्याला अश्रू अनावर झाले आहेत. हसनपूरचे माजी आमदार रामरतन यांनी खूप वेळ बोलण्याची संधी मिळेल म्हणून वाट पाहिली पण त्यांना भाषण करण्याची संधी मिळालीच नाही.रामरतन यांना रडताना पाहून व्यासपीठावर असलेल्या भाजपाच्या काही नेत्यांनी यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रामरतन काहीच न बोलता केवळ डोळ्यातील अश्रू पुसताना दिसले.

नवी दिल्ली - लोकसभा 2019 ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. प्रचारसभेतील भाषणं आणि किस्से सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सभेदरम्यान व्यासपीठावर अनेकांना बोलण्याची संधी दिली जाते तर काही वेळा प्रोटोकॉलमुळे अनेकांना भाषण करता येत नाही. काही दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी भाषण थांबवल्याने भावुक झाले होते. असाच एक प्रकार हरयाणातील पलवलमध्ये पाहायला मिळाला आहे. व्यासपीठावर बोलण्याची संधी न मिळाल्याने एका भाजपा नेत्याला अश्रू अनावर झाले आहेत. 

हरयाणातील पलवलमध्ये रविवारी (14 एप्रिल) मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्यासह भाजपाचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी काही नेत्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली होती. व्यासपीठावर हसनपूरचे माजी आमदार रामरतन हे देखील उपस्थित होते. त्यांना सभेत भाषण करायचे होते. मात्र रामरतन यांनी खूप वेळ बोलण्याची संधी मिळेल म्हणून वाट पाहिली. पण त्यांना भाषण करण्याची संधी मिळालीच नाही. या संपूर्ण प्रकारामुळे भावुक झालेले रामरतन व्यासपीठावरच रडायला लागले. 

रामरतन यांना रडताना पाहून व्यासपीठावर असलेल्या भाजपाच्या काही नेत्यांनी यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रामरतन काहीच न बोलता केवळ डोळ्यातील अश्रू पुसताना दिसले. या घटनेचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे. पत्रकारांनी रामरतन यांच्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी प्रोटाकॉलचे कारण दिले आहे. प्रोटोकॉलमुळे रामरतन यांचा नंबर न आल्याने त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली नसल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अन्...खासदार दिलीप गांधी भडकलेकाही दिवसांपूर्वी भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी चांगलेच चिडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेस्थळी पोहोचण्यापुर्वी काही वेळ अगोदर हा प्रसंग घडला होता. मात्र, उमेदवार डॉ. सुजय विखेंनी सर तुम्ही बोला अशी विनंती केल्यानंतर गांधी पुन्हा बोलायला लागले. पण, बोलताना त्यांचा कंट दाटला होता. मनस्वी आलेला राग गिळताना दिलीप गांधींच्या डोळे पाणावल्याचे कॅमेऱ्यात टिपले गेले. भावूक झालेल्या दिलीप गांधींची नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा नगरमध्ये चर्चेचा विषय बनली होती. 

खासदार दिलीप गांधी यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबविण्यास सांगितले. यावेळी दिलीप गांधी चांगलेच भडकले होते. गांधी म्हणाले, दोन मिनिटांत, मी 10 मिनिटे बोलतो. नाहीतर मला बोलायचं नाही, असे म्हणत गांधी सभेतून निघून जात होते. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांनी सर तुम्ही बोला, म्हणत गांधींना भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर भाषणात दिलीप गांधी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHaryana Lok Sabha Election 2019हरियाना लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा