शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी सीटवरून वाद घातला, विमानाला ४५ मिनिटे उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 05:43 IST

दिल्ली-भोपाळ प्रवास : विमान कर्मचाऱ्यांनी गैरवर्तणूक केल्याची ठाकूर यांची तक्रार

नवी दिल्ली : भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा स्पाईस जेटच्या विमान कर्मचाऱ्यांसोबत सीटवरून वाद झाल्यामुळे विमानाला ४५ मिनिटे उशीर झाला. विमान कर्मचाºयांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याची तक्रार ठाकूर यांनी केली आहे. दिल्ली-भोपाळ विमानात हा प्रकार घडला. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूर यांनी भोपाळ विमानतळ संचालकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी बुक केलेले सीट मला देण्यास विमान कर्मचाºयांनी नकार दिला. त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले.

स्पाईस जेटच्या कर्मचाºयांनी यापूर्वीही एकदा माझ्याशी अशीच गैरवर्तणूक केली होती. त्यावेळी तर मी बुक केलेले सीटही त्यांनी मला दिले नव्हते. स्पाईस जेटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रज्ञा ठाकूर यांनी १ ए सीट बुक केले होते. तथापि, त्या विमानात स्वत:ची व्हिलचेअर घेऊन आल्या होत्या. त्यामुळे नियमानुसार, त्यांना बिगर-आपत्कालीन (नॉन-इमर्जन्सी) रांगेतील सीटवर जाण्यास सांगण्यात आले. त्याला त्यांनी नकार दिला. त्यामुळे विमानाला उशीर झाला. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यावरून झालेल्या वादावादीमुळे विमानाला ४५ मिनिटे उशीर झाला.प्रकरण काय?च्भोपाळ विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना प्रज्ञा ठाकूर यांनी सांगितले की, विमान कंपनीच्या कर्मचाºयांनी माझ्याशी योग्य प्रकारे वर्तन केले नाही. मी त्यांना नियम दाखविण्यास सांगितले. मी संचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.च्स्पाईस जेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा कारणास्तव या विमानातील पहिल्या रांगेतील सीट व्हिलचेअरवरील प्रवाशांना दिले जात नाही. खासदारांनी व्हिलचेअर कंपनीकडे बुक केलेली नव्हती, त्यामुळे कर्मचाºयांना त्या व्हिलचेअरवर आहेत, हे माहिती नव्हते. शेवटी त्यांनी २ बी हे सीट स्वीकारल्यानंतर विमान उडू शकले.

टॅग्स :Member of parliamentखासदारbhopal-pcभोपाळdelhiदिल्लीspicejetस्पाइस जेट