शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

अखिलेश 'कालचं पोरगं' तर मायावती 'होलिका'; भाजपा नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 17:17 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला असतानाच विविध नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनाही उत आला आहे.

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला असतानाच विविध नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनाही उत आला आहे. बेताल वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते नरेश अग्रवाल यांनी अखिलेश यादव यादव यांचा उल्लेख कालचं पोरगं तर मायावतींचा उल्लेख होलिका असा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. हरदोई येथी श्रवण देवी मंदिरात आयोजित कार्यकर्ता संमेलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या नरेश अग्रवाल यांनी मायावतींबाबत आक्षेपार्ह विधान करताना त्यांची तुलना होलिकेशी केली. ''होलिका दहनाची सुरुवात हरदोई येथून झाली होती. तेव्हासुद्धा बुआ जळाली होती. आजच्या निवडणुकीच्या वातावरणात बुआ आणि बबुआची जळण्याची वेळ आली आहे.''यावेळी नरेश अग्रवाल यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. अखिलेश यादव यांची त्यांनी कालचं पोरगं, अशी संभावना केली. "अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री बनवणे ही चूक होती. ते सरकारी बंगला सोडताना नळाची तोटीसुद्धा उखडून घेऊन गेले. आता जनतेची तोटी उखडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका नरेश अग्रवाल यांनी केली. नरेश अग्रवाल यांनी भाजपाविरोधात तयार झालेल्या महाआघाडीवरही टीका केली. आघाडी ही पती-पत्नींमध्ये होते. भाऊ-बहीण आणि आत्यामध्ये कसली आघाडी, असा सवाल त्यांनी केला. तसेच राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाची सत्ता असलताना सरकारमधील रिक्त पदे वेळीच भरली असती तर आज 22 पदे रिक्त राहिली नसती असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगवावला. नरेश अग्रवाल यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. नंतर त्यांनी भारतीय लोकतांत्रिक काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. पुढे ते समाजवादी पक्षात दाखल झाले. तर सपाची सत्ता गेल्यावर त्या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ते बसपात गेले. पुढे 2012 मध्ये सपा पुन्हा सत्तेत आल्यावर ते सपाच्या कोट्यातून राज्यसभेवर पोहोचले. तर 2017 मध्ये सपाची सत्ता गेल्यानंतर त्यांनी भाजपाचा हात धरत ते भाजपामध्ये दाखल झाले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Akhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावतीBJPभाजपा