शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट कारखान्यांवर का नाराज आहेत नितिन गडकरी? स्पष्टच बोलले; बदलावा लागला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 15:28 IST

"आता आम्ही प्लॅन केला आहे की, संसदेत गेलो की विधेयक बनवून सर्व मापदंड बदलून टाकायचे."

भाजप नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आमचे 60-70 टक्के रस्ते आता पूर्णपणे काँक्रिटचे बनले आहेत. हेही खरे आहे, की मी तुमच्या कार्यक्रमात म्हणालो होतो, की 100 टक्के रस्ते काँक्रीटचे होतील. मी देशातील सिमेंट इंडस्ट्रीतील 40 टक्के सिमेंट रस्ते बांधण्यासाठी वापरत आहे. जेव्हा मी सिमेंट खरेदी करायला सुरुवात केली, सिमेंटचे रस्ते तयार करायला सुरुवात केली, तेव्हा सिमेंट कंपन्यांनी 180 रुपयांची सिमेंटची बॅग 380 रुपयांना केली. मला याचे वाईट वाटले, असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

गडकरी म्हणाले, देशातील सिमेंट उद्योगाला मी खूप मोठा ऑक्सिजन दिला आहे. मी 40 टक्के सिमेंट खरेदी करत आहे. पण आता हे लोक दर वाढवत आहेत. याचे मला वाईट वाटले. यामुळेच मी आता 100 टक्के रस्ते सिमेंटने बनवण्याचा निर्णय सोडला आहे. आता मी स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करण्याची रणनीती बनवली आहे. आता मी उघडपणे स्टील आणि सिमेंटचा वापर कमी करण्यावर जोर देत आहे. मात्र, ज्या ठिकाणी अधिक पाऊस होतो, त्या ठिकाणचे रस्ते सिमेंटचेच होतील. मात्र आता कचऱ्यापासून रस्ते बांधले जात आहेत आणि ते चांगलेही होत आहेत.

गाड्यांच्या स्पीड लिमिटवर काय म्हणाले गडकरी - गडकरी म्हणाले, भारतातील वाहनांच्या वेग मर्यादेचे मापदंड, हे आमच्यासाठी एक मोठे आव्हान आहे. कारच्या वेगासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही. आज देशात असे एक्सप्रेस वे तयार झाले आहेत, ज्यांवर कुत्राही येऊ शकत नाही. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. यामुळे, आता आम्ही प्लॅन केला आहे की, संसदेत गेलो की विधेयक बनवून सर्व मापदंड बदलून टाकायचे. ते म्हणाले, कारच्या गतीसंदर्भात, गती वाढली की अपघात होईल, अशी एक मानसिकता तयार झाली आहे. या मानसिकतेतून बाहेर पडायचे आहे. यासाठी आम्ही फाईल तयार करत आहोत. यात, एक्स्प्रेस वेपासून महामार्ग, शहरे आणि जिल्ह्यांच्या रस्त्यांपर्यंत गती मर्यादा तयार केली जात आहे. लोकशाहीत आपल्याला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि न्यायाधीशांना निर्णय देण्याचा अधिकार आहे, असेही गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाroad transportरस्ते वाहतूक