शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

"मोठी गडबड, भाजप सोडत आहेत", संजय सिंह यांचं ट्विट; नितीन गडकरींनी दिलं चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 20:57 IST

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर करत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी, ते भाजप सोडत आहेत का? असा प्रश्न केला आहे. यानंतर, स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुणाचेही नाव न घेता उत्तर देत इशारा दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय बोर्डातून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना वगळण्यात आले आहे. यानंतर, त्यांच्या संदर्भात विविध प्रकारचे तर्क लावले जात आहेत. एवढेच नाही, तर विरोधी पक्षांतील काही लोक गडकरी आणि पंतप्रधान मोदी यांच्यांत मतभेज आहेत, अशा स्वरुपात ही घटना रंगवत आहेत अथवा सादर करत आहेत. 

यातच आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर करत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी, ते भाजप सोडत आहेत का? असा प्रश्न केला आहे. यानंतर, स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुणाचेही नाव न घेता उत्तर देत इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या विरोधात दुष्प्रचार चालविणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. 

नितीन गडकरी यांचे जे भाषण व्हायरल केले जात आहे आणि जे आम आदमी पक्षाच्या खासदारांनी ट्विट केले आहे, यात ते म्हणत आहेत, की त्यांना पद असल्याने आणि नसण्याने फरक पडत नाही. ते म्हणत आहेत, ''राहीले नाही, तर फरक पडत नाही, माझे पद गेले तर गेले, चिंता नाही. मी काही प्रोफेशनल राजकारणी नाही. जे होईल ते पाहिले जाईल. मी तर सामान्य नागरिक आहे. अजूनही फुटपाथवर खाणारा, थर्ड क्लासमध्ये पिक्चर बघणारा आणि मागून नाटक बघणाऱ्या लोकांमध्ये वाढलो आहे. मला तेच जीवन फार चांगले वाटते. झेड प्लस सिक्यॉरिटी अडचण होते, तेव्हा रात्री सर्वांना सोडल्यानंतर मी निघून जातो.'' या व्हिडिओमध्ये काही जर्क देखील आहेत.

गडकरींचा इशारा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी चुकीच्या संदर्भाने त्यांचे भाषण दाखवणाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ते म्हणाले, आपण कायदेशीर अॅक्शन घेण्यासही संकोच करणार नाही. एकापाठोपाठ एक ट्विट करत गडकरी म्हणाले, त्यांच्या विरोधात एक खोटी प्रचार मोहीम चालविली जात आहे. गडकरी म्हणाले, ''राजकीय फायद्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्या विरोधात नापाक आणि बनावट मोहिमेच्या माध्यमाने काही मेनस्ट्रीम मिडिया, सोशल मिडिया आणि काही लोकांकडून, एका सार्वजनिक कार्यक्रमात केली गेलेली वक्तव्य चुकीच्या संदर्भाने दाखवीली जात आहेत.''

कायदेशीर कारवाईचा इशारा - गडकरी म्हणाले, ''खरे तर, फ्रिंज एलिमेंट्सच्या अशा दुर्भावनापूर्ण अजेंड्याचा मला कधीही त्रास होत नाही. मात्र, मी या सर्व संबंधित लोकांना इशारा देतो, की जर असा खोडसाळपणा सुरूच राहिला, तर मी आपले सरकार, पक्ष आणि आमच्या लाखो मेहनती कार्यकर्त्यांच्या व्यापक हिताचा विचार करता, त्या सर्वांना कायद्याचे कक्षेत नेण्यास कसल्याही प्रकारचा संकोच करणार नाही. त्यामुळे मी प्रत्यक्षात जे बोललो होतो, त्याची लिंक शेअर करत आहे.'' गडकरी यांनी आपल्या ट्विटसोबत ते संपूर्ण भाषणही शेअर केले आहे. जे काही भाग कापून व्हायरल केले जात आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाAAPआप