शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

... पण आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका 

By जयदीप दाभोळकर | Updated: January 2, 2021 16:51 IST

कोरोना विषाणूवरील लसीवरून राजकारणाला सुरूवात, भाजपावर विश्वास नसल्याचं अखिलेश यादवांचं वक्तव्य

ठळक मुद्देभाजपाची लस आपण घेणार नसल्याचं अखिलेश यादवांनी केलं होतं वक्तव्यआपलं सरकार बनल्यावर सर्वांना मोफत लस देणार असल्याचं म्हणाले होते अखिलेश यादव

आता भारतातही कोरोना लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच करोना लसीकरणाबाबत सरकारही व्यापक मोहीम हाती घेण्याच्या तयारीत आहे. परंतु आता लसीकरणावरूनच राजकारणाला सुरुवात करण्यात आली आहे. आपला भाजपावर विश्वास नसून भाजपाकडून देण्याच येणारी कोरोनावरील लस आपण घेणार नसल्याचं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केलं. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी अखिलेश यादव यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. "काय म्हणणार अशा माणसांना जे औषधांमध्येही पक्ष शोधतात. प्रत्येक आजारावर लस येईल. पण आजारी मानसिकतेवर कधीच औषध येणार नाही आणि जोपर्यंत ही आजारी मानसिकता भारतातून जात नाही तो पर्यंत आपल्या देशाचं काही खरं नाही," असं म्हणत निलेश राणे यांनी अखिलेश यादवांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले होते अखिलेश यादव?"जे सरकार टाळ्या आणि थाळ्या वाजवत होते तेच सरकार आता लसीकरणासाठी मोठी साखळी का तयार करत आहे? टाळ्या आणि थाळ्या वाजवूनच कोरोनाला का पळवून लावत नाहीत. मी सध्यातरी कोरोनावरील लस घेणार नाही. माझा भाजपाच्या लसीवर विश्वास नाही. जेव्हा आमचे सरकार बनेल तेव्हा सर्वांना मोफत लस देऊ, आम्ही भाजपाची लस घेऊ शकणार नाही," असं अखिलेश यादव म्हणाले. याव्यतिरिक्त अखिलेश यादव यांनी भाजपावर खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला. "गेल्या काही वर्षांत देशाने खूप कठीण दिवस पाहिले आहेत. एवढे वाईट आणि काळे दिवस आम्ही पाहिले नव्हते. उत्तर प्रदेश सरकारने एवढी खोटी आश्वासने दिली आहेत की, आपण कल्पानाच करू शकणार नाही," असंही ते म्हणाले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkhilesh Yadavअखिलेश यादवNilesh Raneनिलेश राणे BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ