मोदींच्या भाषणा दरम्यान भाजप नेते, केजरीवाल झोपले

By Admin | Updated: August 15, 2016 14:32 IST2016-08-15T14:31:09+5:302016-08-15T14:32:58+5:30

लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना भाजपाचे काही नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चक्क डुलकी घेत होते.

BJP leader Kejriwal slept during Modi's speech | मोदींच्या भाषणा दरम्यान भाजप नेते, केजरीवाल झोपले

मोदींच्या भाषणा दरम्यान भाजप नेते, केजरीवाल झोपले

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरु असताना भाजपाचे काही नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चक्क डुलकी घेत होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदींच्या भाषणा दरम्यान झोप लागल्याचे दृश्य कॅमे-यांनी टिपले. 
 
पंतप्रधान मोदींनी तब्बल ९४ मिनिटे भाषण केले. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेले आजवरचे हे सर्वात दीर्घ भाषण आहे. मोदींनी आजच्या भाषणाने मागच्यावर्षी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचा विक्रम मोडला. 
 
मोदींनी आपल्या भाषणात आकडेवारी, सरकारची कामगिरी आणि पाकिस्तानवर कठोर टीका केली. मोदी उत्साहात भाषण करत होते. मात्र लांबलेल्या भाषणामुळे त्यांच्याच सरकारमधल्या मंत्र्यांना झोप लागली. 
 
 

Web Title: BJP leader Kejriwal slept during Modi's speech