शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

झेड सुरक्षा असतानाही NSUIनं ज्योतिरादित्य शिंदेंचा ताफा रोखला, दिली बेशरमाची फुलं; मिळालं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 19:22 IST

शिंदेंचा ताफा एअरपोर्टवर पोहोचणारच होता, तेवढ्यात गोला चौराहा येथे जवळपास 20 ते 22 लोकांनी त्यांचा ताफा रोखला...

ग्वाल्हेर - भाजपचे राज्यसभा खासदारज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya scindia)यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले आहे. ग्वाल्हेर येथे NSUIच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा थांबवून त्यांना बेशरमाची फुलं आणि सुताची माळ दिल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला तेव्हा पोलीसही केवळ मूकदर्शक होऊन पाहतच राहिले. (BJP leader Jyotiraditya scindia security break nsui workers gave besharm garland and memorandum)

खरे तर, आधीच काही तरी गडबड होण्याची शक्यता होतीच. शिंदेंचा ताफा एअरपोर्टवर पोहोचणारच होता, मात्र, तेवढ्यात गोला चौराहा येथे जवळपास 20 ते 22 लोकांनी त्यांचा ताफा रोखला आणि त्यांना निवेदन देण्याच्या बहाण्याने बेशरमाची फुलं आणि माळ दिली.

शिंदेंचे औदार्य - खासदारज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप कार्यकर्ते समजून आपली गाडी थांबवली होती. मात्र, निवेदन देणारे लोक NSUIचे कार्यकर्ते आहेत, हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी सुताची माळ घेतली, तथाकथित निवेदनाचा कागदही घेतला. मात्र, बेशरमाची फुलं NSUIच्या कार्यकर्त्यांना परत केली. शिंदेनी सुताची माळा आपल्या सुरक्षा रक्षकांकडे दिली. तर NSUIचे निवेदन आपल्या जवळच ठेवले आणि शिंदेचा ताफा एअरपोर्टकडे रवाना झाला. 

ज्योतिरादित्य यांना देण्यात आली आहे झेड दर्जाची सुरक्षा -ज्योतिरादित्य यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारची सुरक्षा असलेल्या लोकांची सुरक्षा यंत्रणा सक्रिय असते आणि आधीच, अशा घटनांची माहिती मिळवते. मात्र या वेळी पोलीस फक्त बघतच होते. विशेष म्हणजे शिंदेंसोबत असा प्रकार त्यांच्याच शहरात घडला.

Jitin Prasad News: ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपाने पुन्हा काँग्रेस फोडली; उत्तर प्रदेशचा हा बडा नेता लागला गळाला

ज्योतिरादित्य शिंदे सध्या आपली छबी बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. ते छोट्या-मोठ्या सर्वच नेत्यांना भेटत आहेत. एवढेच नाही, तर त्यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयभान सिंह पवैया यांच्या घरीही ते पोहोचले होते. माजी मंत्री जयभान सिंह आणि सिंधिया कुटुंब 23 वर्षांचे कट्टर विरोधक आहेत. तरीही ते पवैया यांच्या घरी गेले होते. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते. 

20 एप्रिलला पवैया यांच्या वडिलांचे नधन झाले. यामुळे ज्योतिरादित्य त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी बंद खोलीत हे नेते जवळपास 20 ते 25 मिनिटे भेटले. तेथून निघाल्यानंतर ज्योतिरादित्य म्हणाले होते, की भूतकाळ भूतकाळ असतो आणि वर्तमान-वर्तमान. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाMember of parliamentखासदार