शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अधीर रंजन चौधरी यांच्यासाठी भाजपचे दरवाजे नेहमी खुले, कधीही यावे: दिलीप घोष 

By देवेश फडके | Updated: March 3, 2021 09:33 IST

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारण अधिक तापताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. अशातच आता लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी (adhir ranjan choudhary) यांना भाजपकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान होत नाही, त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे पश्चिम बंगालमधील भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देअधीर रंजन चौधरी यांना भाजपकडून खुली ऑफरअधीर रंजन चौधरी यांचा काँग्रेसमध्ये अनादर - भाजपचा दावापश्चिम बंगालमधील राजकीय रणधुमाळी अधिक तीव्र होण्याची चिन्हे

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकारण अधिक तापताना दिसत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. अशातच आता लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी (adhir ranjan choudhary) यांना भाजपकडून खुली ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसकडून अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान होत नाही, त्यांचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे पश्चिम बंगालमधील भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे. (bjp leader dilip ghosh says we welcomes congress leader adhir ranjan choudhary)

भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी अधीर रंजन चौधरी यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षात अधीर रंजन चौधरी यांचा योग्य सन्मान केला जात नाही. अधीर रंजन चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी थेट ऑफर दिलीप घोष यांच्याकडून देण्यात आली आहे. 

सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट

अधीर रंजन चौधरी यांचे भाजपमध्ये स्वागत

अधीर रंजन हे काँग्रेसमधील बडे नेते आहेत. अशा बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये योग्य सन्मान केला जात नाही. ही चांगले नाही. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अधीर रंजन चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. अधीर बाबू आमचे जुने-जाणते नेते आहेत. राजकारणातील ते वरिष्ठ व्यक्ती आहेत. काँग्रेस त्यांना अपमानित करत आहे, तसेच त्यांचा अनादर केला जात आहे. भाजपचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच खुले आहेत. त्यांनी कधीही यावे, असे दिलीप घोष यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती केली असून, त्यात आता मुस्लीम धर्मगुरू अब्बास सिद्दीकी यांचा इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) हा पक्षही सहभागी झाला आहे. प्रक्षोभक विधाने करून सिद्दीकी अनेकदा वादात सापडले आहेत. ‘जी-२३’ गटातील नेते आनंद शर्मा यांनी हाच मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ‘आयएसएफ’ला सहभागी करून घेण्यावर आक्षेप घेतला. त्यावरून काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान आणि बंडखोर नेत्यांमध्ये वाद सुरू आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण