शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा निवडणूक; फडणवीसांचा मनधरणीत जातोय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:25 IST

संघाची मंडळी तर अद्याप प्रचाराला घराबाहेर पडलेली नाही. त्यामुळे या पक्षातील नाराज नेते-पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून त्यांना प्रचारात सक्रिय करण्यातच फडणवीसांचा वेळ जातो आहे. 

राजेश निस्ताने -पणजी : भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची बहुतांश एनर्जी पक्षातील नाराजांची मनधरणी करण्यातच खर्ची पडत आहे. भाजप गोवा विधानसभेच्या सर्वच ४० जागांवर निवडणूक लढवित आहे; परंतु या ४० पैकी २१ उमेदवार हे बाहेरचे अर्थात अन्य पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नाराज आहेत. 

संघाची मंडळी तर अद्याप प्रचाराला घराबाहेर पडलेली नाही. त्यामुळे या पक्षातील नाराज नेते-पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून त्यांना प्रचारात सक्रिय करण्यातच फडणवीसांचा वेळ जातो आहे. 

फडणवीस अनेक दिवसांपासून येथे मुक्कामी आहेत. गत पोटनिवडणुकीच्यावेळी आश्वासन देऊनही दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल यांचे तिकीट कापणे हेसुद्धा संघ-भाजपातील नाराजीचे एक कारण असल्याचे सांगितले जाते.

गोव्यातील भाजप सरकारचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीसारखा - अशोकराव चव्हाण गोव्यात सलग भाजपचे सरकार आहे; परंतु या सरकारचा कारभार केंद्रातून नियंत्रित केला जातोय. या सरकारची अवस्था गेली पाचही वर्षे ईस्ट इंडिया कंपनीसारखी झालेली आहे, अशी टीका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा गोवा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक अशोकराव चव्हाण यांनी केली. चव्हाण म्हणाले, गोव्यातील जनतेला स्थिर सरकार हवे आहे आणि ही स्थिरता केवळ काँग्रेसच देऊ शकते. भाजपने १० वर्षे घालवली; परंतु येथील रोजगाराचा ज्वलंत प्रश्न केंद्र व राज्यातील भाजप सरकारला सोडविता आला नाही. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा