- नितीन अग्रवालनवी दिल्ली : बहुतेक नेत्यांना जन्मभर सरकारी सुख-सुविधांचा लाभ मिळावा, असे वाटते; परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र स्वत:ला वेगळे सिद्ध केले आहे. प्रकृती बरी राहत नसल्यामुळे जेटली यांनी मोदी सरकारमध्ये मंत्रीपद घ्यायला नकार दिल्यानंतर त्यांनी ते राज्यसभेचे सदस्य असूनही सरकारी निवासस्थान स्वेच्छेने सोडले आहे.जेटली अर्थमंत्री म्हणून दिला गेलेला दोन, कृष्ण मेनन मार्गावरील बंगला रिकामा करून आपल्या कैलास कॉलनीतील खासगी निवासस्थानी राहायला गेले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी जेटली यांना उपचारांदरम्यान सरकारी निवासस्थान घेण्याचा आग्रहही केला होता. मोदी तर एवढेही म्हणाले की, एक सल्लागार म्हणून मला त्यांची गरज आहे. त्यांनी बिनखात्याचे मंत्री म्हणून राहावे, असेही म्हटले गेले होते; परंतु जेटली यांनी त्याला नकार दिला व ठरवून सरकारी निवासस्थान सोडले.
भाजपा नेते अरुण जेटली आता खासगी निवासस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 04:38 IST