अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्या नेत्याला अटक
By Admin | Updated: May 31, 2016 22:24 IST2016-05-31T22:15:50+5:302016-05-31T22:24:36+5:30
दोन दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या गोवा- अहमदाबाद फ्लाइटमध्ये 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गांधीनगरमधील एका भाजपाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्या नेत्याला अटक
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 31 - दोन दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या गोवा- अहमदाबाद फ्लाइटमध्ये 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गांधीनगरमधील एका भाजपाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.
अशोक माकवाना असे या भाजपाच्या नेत्याचे नाव असून तो कामगार कंत्राटदार आहे. गेल्या रविवारी इंडिगो एअरलाईन्सच्या गोवा- अहमदाबाद फ्लाइटमध्ये प्रवासादरम्यान आरोपी अशोक माकवानाने 13 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी सरदारनगर पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार अशोक माकवानाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर लैंगिक विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.