शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

दोन वर्षांत देशातून डाव्यांच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल, अमित शाह यांचा विश्वास; हिंसाचारात 90% घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 23:02 IST

शाह यांनी शुक्रवारी डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने प्रभावित राज्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

 गेल्या 4 दशकांत डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने प्रभावित असलेल्या भागांत, सर्वात कमी हिंसाचार आणि मृत्यू 2022 मध्ये नोंदवले गेले. आगामी दोन वर्षांत देशातून डाव्या विचारसरणीच्या कट्टरतेचा पूर्णपणे नायनाट होईल. नक्षलवाद हा मानवतेसाठी शाप आहे आणि आम्ही, त्याच्या सर्व रुपांचा खात्मा करण्यास कटिबद्ध आहोत, असे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. शाह यांनी शुक्रवारी डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने प्रभावित राज्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

नक्षल प्रभावित राज्यांमधील हिंसचाराच्या घटना 2010 च्या तुलनेत 2022 मध्ये 77 टक्यांनी कमी झाल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय, केंद्र सरकारने 2015 मध्ये एलडब्ल्यूईचा सामना करण्यासाठी 'राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखड्या'ला मंजुरी दिली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धोरणात सुरक्षेसंदर्भातील उपाय, विकास हस्तक्षेप, स्थानिक समुदायांचे अधिकार आणि हक्क सुनिश्चित करणे इत्यादींचा समावेश होता. 

 डाव्या कट्टरतावादाच्या हिंसाचारात 90 टक्क्यांची घट -ते म्हणाले, डाव्या कट्टरतावादाच्या हिंसाचारात 2010 च्या तुलनेत 2022 मध्ये सुरक्षा दल आणि नागरिकांच्या मृत्यूची संख्या 90 टक्क्यांनी कमी झाली आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2004 ते 2014 या काळात डाव्या कट्टारतावादाशी संबंधित घनांची संख्या 17,679 एवढी होती, तर मृत्यूचा आकडा 6,984 एवढा होता. या उलट 2014 ते 2023 (15 जून 2023) पर्यंत 7,649 एवढ्या डाव्या कट्टारतावादाशी संबंधित घना, तर 2,020 मृत्यू झाले आहेत.

या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल, इंटेलिजन्स ब्यूरोचे संचालक तपन डेका, तसेच एनआयए, एसएसबी, बीएसएफ, सीआरपीएफ, बीएसएफ आणि एनएसजीच्या महासंचालकांसह नक्षलग्रस्त राज्यांचे गृह सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीBJPभाजपा