राहुल गांधींच्या मुस्लीम लीगसंदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा निशाणा; स्पष्ट शब्दात सांगितलं राजकारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 11:11 AM2023-06-02T11:11:49+5:302023-06-02T11:13:51+5:30

राहुल यांनी मुस्लीम लीगला हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपने राहुल गांधींना थेट प्रत्युत्तर दिले आहे.

bjp leader amit malviya attack over Rahul Gandhi's statement muslim league secular party | राहुल गांधींच्या मुस्लीम लीगसंदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा निशाणा; स्पष्ट शब्दात सांगितलं राजकारण!

राहुल गांधींच्या मुस्लीम लीगसंदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा निशाणा; स्पष्ट शब्दात सांगितलं राजकारण!

googlenewsNext

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे विविध कार्यक्रमाला हजेरी लाऊन ते भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता राहुल यांनी मुस्लीम लीगला हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपने राहुल गांधींना थेट प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात बोलताना भाजप नेते अमित मालवीय यांनी, देशाच्या फाळणीला जबाबदार असलेला मुस्लीम लीग पक्ष राहुल गांधींच्या मते धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. वायनाडमध्ये स्वीकारार्हता टिकवून ठेवण्यासाठी असे बोलणे, ही त्यांची मजबुरी आहे, असे म्हटले आहे.

राहुल गांधी आज वॉशिंग्टन डीसी येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पोहोचले होते. त्यांनी येथे अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान राहुल गांधींना केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) सोबतच्या काँग्रेसच्या युतीसंदर्भात विचारले असता, मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. यात नॉन सेक्युलर असे काहीही नाही, असे राहुल म्हणाले. खरे तर, इंडियन युनियन मुस्लिम लीग केरळमधील काँग्रेस आघाडीचा एक भाग आहे.

भाजपचा निशाणा - 
यामुद्द्यावर भाजप आयटी सेलचे हेड अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर थेट निशाणा साधला आहे. ट्विट करत मालवीय म्हणाले, ''जिनाचा मुस्लीम लीग पक्ष, जो धार्मिक आधारावर भारताच्या विभाजनाला जबाबदार होता, तो पक्ष राहुल यांच्या मते धर्मनिरपेक्ष आहे. वायनाडमध्ये स्वीकारार्हता कायम ठेवण्यासाठी ही त्यांची त्यांची मजबुरी आहे.'' 

खरे तर, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठीसह वायनाडमधून निवडणूक लढवली होती. अमेठीत त्यांचा पराभव झाला होता. तर वायनाडमधून ते विजय होत संसदेत पोहोचले. मात्र, या वर्षी मार्चमध्ये सुरत कोर्टाने त्यांना मानहानीच्या एका प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर, त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

 

Web Title: bjp leader amit malviya attack over Rahul Gandhi's statement muslim league secular party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.