शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

Kangana Ranaut : खासदार झाल्यावर कंगनाला कोणत्या गोष्टीची चिंता?; सुपर पॉवर असती तर केलं असतं 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 14:35 IST

BJP Kangana Ranaut : कंगना खासदार झाल्यापासून सातत्याने आपल्या भागाचे आणि राज्याचे प्रश्न मांडत आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातील भाजपा खासदार कंगना राणौत अनेकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. कंगना खासदार झाल्यापासून सातत्याने आपल्या भागाचे आणि राज्याचे प्रश्न मांडत आहे. संसदेपासून ते रस्त्यांपर्यंत मंडीची परिस्थिती सुधारण्यासाठी ती सातत्याने आपली बाजू मांडत आहे. याच दरम्यान भाजपा खासदाराने मंडी क्षेत्राबद्दल असं काही म्हटलं जे समजल्यावर सर्वजण तिचं कौतुक करतील.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौतला विचारण्यात आलं होतं की, जर तुमच्याकडे कोणती सुपर पॉवर असेल तर तुम्हाला काय बदलायचं आहे? याला उत्तर देताना कंगना म्हणाली, "मला माझ्या मतदारसंघातील पूरजन्य परिस्थिती बदलायला आवडेल. ती दरवर्षी येत असते आणि त्यामुळे खूप विध्वंस होत असतो. पूर थांबवण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करू इच्छिते. आमच्याकडे योग्य प्रमाणात पाऊस पडतो पण कृपया पूर थांबवा, आणखी पूर येऊ नके. मंडीमध्ये पूर आला होता, त्यामुळे मोठं नुकसान झालं."

हिमाचल प्रदेशात, ऑगस्टच्या सुरुवातीला अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला होता. मंडीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कंगनाने पूरग्रस्तांची भेट घेतली होती. ती पीडितांना मिठी मारून सांत्वन करतानाही दिसली. कंगना रणौतने भेटीदरम्यान सांगितलं होतं की, येथे एक हृदयद्रावक शोकांतिका पाहिली आहे. लोकांनी मुलांसह त्यांचं संपूर्ण कुटुंब गमावलं आहे. लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून त्यांना धक्का बसला आहे. हिमाचल सरकारने पीडित कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.

पूर आणि पावसामुळे हिमाचल प्रदेश आणि मंडीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. अजूनही अनेक ठिकाणी भूस्खलन होत असून त्यामुळे रस्ते बंद आहेत. सध्या हिमाचलमधील ४० रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. मंडीमध्ये दरड कोसळल्याने १२ रस्ते बंद करण्यात आले आहेत. कांगडामध्ये १०, कुल्लूमध्ये ९, शिमल्यात ५ आणि उना, सिरमौर, चंबा आणि लाहौल-स्पितीमध्ये प्रत्येकी एक रस्ता बंद आहे.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूर