शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये चाललंय काय? आयटी सेलच्या व्यक्तीकडून स्वपक्षीयांविरोधात पोस्ट; अटक होताच भाजप नेतेच भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 10:06 IST

आयटी सेलमधील कर्मचाऱ्याला अटक होताच भाजपचेच नेते नाराज; राजीनामा देण्याचा इशारा

गांधीनगर: गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सूरतचे भाजप अध्यक्ष नीरज झांझमेरा आणि पक्षातील अन्य नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र या अटकेमुळे भाजपमधील अनेक नेते नाराज आहेत. त्यांनी या अटकेविरोधात आघाडी उघडली असून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचं नाव नितेश वनानी आहे. ते सूरतमध्ये भाजपच्या आयटी सेलमध्ये काम करायचे. सूरत सायबर क्राईम ब्रांचचे निरीक्षक प्रशांत खोखरांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश यांनी राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्या. त्यामुळे त्या नेत्यांची प्रतिमा मलीन झाली. या पोस्ट १९ वेगवेगळ्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आल्या. ही सगळी अकाऊंट बोगस आहेत. या पोस्ट १२ कॉम्प्युटर्सवरून व्हायरल करण्यात आल्या. यामुळे नितेश वनानी यांना अटक करण्यात आली.भारतात फेसबुक बंद होणार, पुढचा नंबर कोणाचा? जयंत पाटलांनी दिले संकेतसूरतच्या पलसाणामध्ये वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते विभाभाई चोसला यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी नितेश यांना त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. दंगल पसरवण्याची हेतूनं विधान करणं, शांततेचा भंग करणं, अश्लिल आणि आक्षेपार्ह वक्तव्य करणं, गुन्हेगारी कारस्थान रचणं यासारखे गुन्हे नितेश यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत.कॉमर्समध्ये पदवी मिळवलेले नितेश रियल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करतात. ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत. नितेश यांच्या अटकेविरोधात सूरतमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि नेते एकवटले आहेत. सूरत शहरातील ६ वॉर्ड अध्यक्ष, ४ महामंत्री यांचा यामध्ये समावेश आहे. यातील अनेकांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सूरत भाजपमधील काही नेत्यांच्या इशाऱ्यावरून नितेश यांना अटक झाल्याचा आरोप या नेत्यांपैकी अनेकांनी केला आहे.

टॅग्स :BJPभाजपा