शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

CAAनंतर मोदी सरकार आज पुन्हा मोठा 'धमाका' करणार?; खासदारांना 'व्हिप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 09:16 IST

भाजपाकडून राज्यसभा खासदारांना व्हिप; महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीनं आपल्या लोकसभा, राज्यसभेतल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सदनातल्या भाजपाच्या खासदारांना सदनात उपस्थित राहणं अनिवार्य असेल. या पार्श्वभूमीवर आज संसदेत नेमकं काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल. मोदी सरकार आज संसदेत एखादं महत्त्वाचं विधेयक मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यासोबतच संध्याकाळी चार वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. अर्थसंकल्पावर उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांना त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तरं देतील. भाजपानं संसदेतल्या सर्व खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. त्यामुळे भाजपाचे सर्व खासदार आज संसदेत उपस्थित असतील. आज एखाद्या महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ४५ विधेयकं मंजूर करण्याचं लक्ष्य भाजपानं ठेवलं होतं. त्यामुळेच आज राज्यसभेत अतिशय महत्त्वाचं विधेयक मांडलं जाऊ शकतं. मात्र याबद्दल भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांना कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. पदोन्नती मूलभूत हक्क नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं एका निकालात म्हटलं आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. संघ आणि भाजपा आरक्षणविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी केली. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनंदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे दलितांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकार एखादं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा