शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

महाराष्ट्र अन् दक्षिणेसह आठ राज्यांतील 165 जागांबाबत भाजपला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 06:01 IST

महाराष्ट्राबाबतही चिंता

संजय शर्मानवी दिल्ली : ‘अबकी बार, ३७० पार’ या घोषणेनंतरही दक्षिणेसह आठ राज्यांतील १६५ जागांबाबत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिंता वाढली आहे. प्रामुख्याने भाजपची युती कमकुवत दिसत आहे किंवा युती अपयशी ठरली आहे, अशा जागांचा त्यात समावेश आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारसभांमध्ये ‘अब की बार ३७० पार आणि ४ जून को ४०० पार’ची घोषणा देत आहेत; परंतु भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, पंजाब, हरयाणातील सुमारे १६५ जागांवर भाजप आणि मित्रपक्षांची स्थिती चिंताजनक आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्राबाबतही चिंताभाजप नेत्यांच्या बैठकीत महाराष्ट्राबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्रात भाजप, शिंदेसेना व अजित पवार गटाचे सरकार असून, त्यावर अँटी-इन्कम्बन्सीचा प्रभाव पडणार असल्याचे बोलले जात आहे.

बिहार, ओडिशा, पंजाब मोजावी लागेल किंमत? बिहारदेखील भाजपसाठी चिंतेचे सर्वांत मोठे कारण आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयूशी युती असूनही अहवाल फारसा उत्साहवर्धक नाही. बिहारमध्ये भाजपला ४० पैकी ४० जागा जिंकायच्या आहेत; पण जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टीबाबत असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. ओडिशात बिजू जनता दलाशी युती अयशस्वी झाल्याची तसेच पंजाबमध्ये अकाली दलाशी युती न झाल्याची किंमत भाजपला चुकवावी लागू शकते.हरयाणातही भाजपने चौटाला यांच्या आयएनएलडीसोबतची युती तोडली, त्यामुळे तीन ते चार जागांवर तोटा होऊ शकतो. झारखंडमध्ये हेमंत सोरेन, तर दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे नुकसान होऊ शकते.

दक्षिणेकडून अपेक्षा नाही : तेलंगणाशिवाय दक्षिण भारतातील इतर राज्यांकडून भाजपला फारशा आशा नाहीत. आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत युती केल्याने दोन जागांवर फायदा मिळू शकतो. तामिळनाडूतही एक- दोन जागा जिंकता येतील. तेलंगणात चार जागा जिंकण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४